बेनेगल, अपर्णा सेन, अनुरागसह अन्य ४९ मान्यवरांवर देशद्रोहाचे गुन्हे

बेनेगल, अपर्णा सेन, अनुरागसह अन्य ४९ मान्यवरांवर देशद्रोहाचे गुन्हे

मुझफ्फरपूर : देशभरात झुंडशाहीच्या वाढत्या घटनांबद्दल चिंता व्यक्त करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विषयावर लक्ष घालण्याची विनंती करणाऱ्या अपर्णा स

उ. प्रदेश हिंसाचार : अनुराग, स्वराकडून न्यायालयीन चौकशीची मागणी
अनुराग ‘डिसेंट’ कश्यप
४९ मान्यवरांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा : बिहारमध्ये याचिका

मुझफ्फरपूर : देशभरात झुंडशाहीच्या वाढत्या घटनांबद्दल चिंता व्यक्त करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विषयावर लक्ष घालण्याची विनंती करणाऱ्या अपर्णा सेन, श्याम बेनेगल, अनुराग कश्यप, रामचंद्र गुहा अशा कला-साहित्य व अन्य क्षेत्रातल्या ४९ मान्यवरांच्या विरोधात गुरुवारी फिर्याद दाखल करण्यात आली. शहरातील एक वकील सुधीर कुमार ओझा यांनी जुलै महिन्यात या ४९ मान्यवरांच्याविरोधात स्थानिक न्यायालयात देशद्रोह व अन्य गुन्हे दाखल करावे यासंदर्भात एक याचिका दाखल केली होती. त्यावर निर्णय देताना मुख्य न्यायदंडाधिकारी सूर्यकांत तिवारी यांनी या मान्यवरांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.

या ४९ मान्यवरांवर आता देशद्रोह, सामाजिक अशांतता निर्माण करणे, धार्मिक भावना चेतावणे अशा प्रकारांचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पंतप्रधान मोदींना पत्र लिहून अपर्णा सेन, शाम बेनेगल सहित ४९ मान्यवरांनी फुटीरतावाद्यांचे समर्थन करून देशाची प्रतिमा धुळीस मिळवली असल्याचा आरोप ओझा यांनी आपल्या याचिकेत केला होता. त्यामुळे या ४९ मान्यवरांवर देशद्रोह व भारतीय दंडसहितेतील काही गुन्हे दाखल करावे अशी मागणी ओझा यांनी याचिकेत केली होती. ओझा यांनी साक्षीदार म्हणून अभिनेत्री कंगना रनौट, चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकर व विवेक अग्निहोत्री यांचे नाव याचिकेत घेतले होते.

या पत्रावर प्रख्यात सिनेदिग्दर्शक श्याम बेनेगल, अपर्णा सेन, अनुराग कश्यप, मणिरत्नम, शास्त्रीय संगीत गायिका शुभा मुदगल, इतिहासकार रामचंद्र गुहा, बंगालमधील ज्येष्ठ सिनेकलाकार सौमित्र चटर्जी, दक्षिणेतल्या सिनेनिर्मात्या व अभिनेत्री रेवती, सामाजिक कार्यकर्ते विनायक सेन व विख्यात सामाजिक शास्त्रज्ञ आशिष नंदी आदींच्या स्वाक्षऱ्या होत्या.

या पत्रात या मंडळींनी ‘जय श्रीराम’चा नारा एक प्रकारचा युद्धघोष वाटू लागला आहे याबाबतही चिंता व्यक्त केली होती. लोकशाहीत मतमतांतरे असतात व ती व्यक्त करणे अपरिहार्य व अपेक्षित आहेत पण या देशाचे नागरिक असून सुद्धा सरकारवर टीका करणाऱ्यांना देशद्रोही, अर्बन नक्षल ठरवले जात आहे. प्रत्येक विरोध हा देशविरोधी भावनांशी जोडला जात असल्याच्या मुद्द्याकडेही या पत्रात लक्ष वेधण्यात आले होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0