आज आणि उद्या दिल्लीत ‘अधांतर’चे प्रयोग

आज आणि उद्या दिल्लीत ‘अधांतर’चे प्रयोग

प्रतिभावान भारतीय नाटककार जयंत पवार यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी राष्ट्रीय नाट्य विद्यालय रंगमंडळ, नवी दिल्लीतर्फे, ‘अधांतर’ या हिंदी नाटकाचे प्रयोग ११ आणि १२ सप्टेंबरला होणार आहेत.

गोगोई यांच्याविरोधात हक्कभंगाची नोटीस
यंदा शैक्षणिक फीमध्ये १५ टक्के कपात
गुरुद्वाराचे पावित्र्यभंग; दोघांची जमावाकडून हत्या
जयंत पवार

जयंत पवार

प्रतिभावान भारतीय नाटककार जयंत पवार यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी राष्ट्रीय नाट्य विद्यालय रंगमंडळ, नवी दिल्लीतर्फे, ‘अधांतर’ या हिंदी नाटकाचे प्रयोग ११ आणि १२ सप्टेंबरला होणार आहेत.

जयंत पवार यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी राष्ट्रीय नाट्य विद्यालया(एनएसडी)च्या रंगमंडळा(repertory)तर्फे जयंत पवार यांच्या ‘अधांतर’ या नाटकाचे ४ प्रयोग केले जाणार आहेत.

हे प्रयोग ११ सप्टेंबर आणि १२ सप्टेंबर या दोन दिवशी दररोज दोनदा केले जाणार आहेत. दुपारी अडीच आणि संध्याकाळी साडेसहा वाजता हे प्रयोग केले जाणार असून, राष्ट्रीय नाट्य विद्यालय रंगमंडळाच्या युट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटर पेजवर लाईव्ह केले जाणार आहेत.

अनिरुद्ध खुटवड

अनिरुद्ध खुटवड

नाटकाच्या प्रयोगांचे दिग्दर्शन अनिरुद्ध खुटवड यांनी केले असून, मूळ मराठीमध्ये जयंत पवार यांनी केलेल्या ‘अधांतर’ या नाटकाचा हिंदीमध्ये अनुवाद कैलाश सेंगर यांनी केला आहे. नाटकाची प्रस्तुती राष्ट्रीय नाट्य विद्यालय रंगमंडळ यांची आहे.

अनिरुद्ध खुटवड यांनी ‘द वायर मराठी’ला सांगितले, “भारतीय रंगभूमीवरील प्रगल्भ मराठी नाटककार जयंत पवार यांनी लिहिलेल्या ‘अधांतर’ आणि ‘काय डेंजर वारा सुटलाय’ या दोन्ही नाटकांचे दिग्दर्शन (मराठी आणि हिंदी भाषेत) करण्याची मला संधी मिळाली. ‘काय डेंजर वारा सुटलाय’ हे नाटक महाराष्ट्र रंगभूमी, मुंबई तर्फे मराठी व्यावसायिक रंगभूमीवर दिग्दर्शित केलं तर ‘अधांतर’ हे नाटक ललित कला केंद्र (CPA) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, राष्ट्रीय फिल्म आणि टेलिव्हिजन संस्था (FTII) पुणे, राष्ट्रीय नाट्य विद्यालय (NSD) आणि राष्ट्रीय नाट्य विद्यालय रंगमंडळ, नवी दिल्ली या नाट्य शिक्षण संस्थेच्या वतीने यापूर्वी दिग्दर्शित केलं आहे. आता जयंतला आदरांजली वाहण्यासाठी या नाटकाचे पुन्हा ४ प्रयोग दिल्लीत आम्ही करीत आहोत.”

खुटवड म्हणाले, “नाटककार आणि दिग्दर्शक या नात्यातील जयंत आणि माझ्या मैत्रीने मला वैचारिक आणि संवेदनशीलदृष्ट्या अतिशय समृद्ध केलं. मी जयंतचा आयुष्यभरासाठी ऋणी आहे.”

‘अधांतर’ ११ आणि १२ सप्टेंबर रोजी दुपारी अडीच आणि संध्याकाळी साडेसहा वाजता  https://www.facebook.com/nsdnewdelhi , https://twitter.com/nsd_india, https://www.instagram.com/nsd_official_/https://www.youtube.com/c/NationalSchoolofDrama या ठिकाणी ऑनलाईन पाहता येईल.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: