महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी वेगात

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी वेगात

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंड केल्याच्या पार्श्वभूमीवर वेगाने घडामोडी घडत आहेत.

भाजपच्या एकाच म्यानात दोन तलवारी
चकवा देणारा नोबेल
अहमदाबादेतील व्हेंटिलेटरचे गौडबंगाल आणि भाजपचे लागेबांधे
  • आमदारांना सूरतमधून हलविण्याची तयारी. ३ बसेस आणि काही गाड्या हॉटेल आवारात तैनात करण्यात आल्या आहेत, तसेच विमान तळावर खाजगी विमाने तयार ठेवण्यात आली होती.
  • आमदार नितीन देशमुख यांना डांबून ठेवल्याचा शिवसेना नेते अरविंद सावंत यांचा आरोप. टीव्ही ९ वाहिनीने त्यासंदर्भात एक ऑडिओ क्लीप जाहीर केली.
  • सूरतमध्ये एकनाथ शिंदे यांच्याबरोबर ३३ आमदार असल्याचे वृत्त.
  • राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या मुंबईतील निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील पोहोचले आहेत. शरद पवार नुकतेच दिल्लीतून मुंबईत परतले असून, राष्ट्रवादी नेत्यांमध्ये बैठक सुरू झाली आहे.
  • केंद्रातील भाजप सरकारचा हा उद्योग आहे. सर्व तपास यंत्रणा वापरल्या जात आहेत. हे सगळे गुजरात म्हणून सुरू आहे. अनेक राज्यात असे कट रचले गेले. – कॉँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले
  • कॉँग्रेसचे सर्व आमदार संपर्कात. लवकरच आमदारांची बैठक मुंबईत होणार. सरकारला अडचण नाही. – कॉँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले
  • शिवसेनेचे नवे गटनेते अजय चौधरी यांनी विधान भवनात जाऊन आमदारांचे गटनेते म्हणून निवड झाल्याचे समर्थनाचे पत्र दिले.
  • राज्यभरात ठिकठिकाणी शिवसैनिकांची निदर्शने.
  • शिवसेना भवन दादर येथे शिवसैनिक जमा होऊ लागले. उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ घोषणा.
  • महाराष्ट्र सरकारला कोणताही धोका नाही – कॉँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे
  • सरकारला धोका नाही – मंत्री छगन भुजबळ
  • सरकार राहिलेले नाही. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा – नारायण राणे
  • मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक सुरू.
  • उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची चर्चा.
  • थोड्याच वेळात उद्धव ठाकरे शिवसेनेच्या आमदारांची बैठक घेणार.
  • भाजप बरोबर युती करावी, असा प्रस्ताव फोन करून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केल्याचे वृत्त टीव्ही माध्यमांनी दिले आहे.
  • सूरतमध्ये शिवसेनेच्या २ आमदारांना मारहाण झाल्याचा शिवसेना नेते संजय राऊत यांचा आरोप.
  • मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक यांची सूरतमध्ये हॉटेल ली मेरेडियनमध्ये  एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा संपली.
  • एकनाथ शिंदे यांचे ट्विट – “आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही”
  • शिवसेनेचे दूत म्हणून मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक सुरतमध्ये एकनाथ शिंदे यांच्या भेटीला पोहोचले.
  • शिवसेनेच्या विधानमंडळ गटनेतेपदी शिवडीचे आमदार अजय चौधरी यांची नियुक्ती.
  • शिवसेनेने विधानमंडळ गटनेते पदावरून एकनाथ शिंदे यांना हटवले.
  • वर्षा या मुख्यमंत्री निवासस्थानी झालेल्या शिवसेना आमदारांच्या बैठकीला १८ आमदार उपस्थित.
  • राज्याच्या राजकारणात निर्माण झालेल्या प्रश्नावर चर्चेमधून तोडगा निघू शकतो. हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न असून, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. अडीच वर्ष सरकार योग्य चालत असल्याने हे षडयंत्र आखण्यात आले असल्याचा आरोप शरद पवारांनी केला आहे.
  • शिवसेना आमदार नितीन देशमुख बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या पत्नी प्रांजली देशमुख यांनी पोलिसांकडे केली आहे. मतदानानंतर संध्याकाळी मुंबईहून अकोल्याला येत असल्याचे देशमुख यांनी सांगितले होते मात्र, त्यांचा फोन बंद असून, कोणताही संपर्क नाही. त्यामुळे बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर पोलीस सूरतकडे रवाना झाल्याचे समजते.
  • एकनाथ शिंदे काही आमदारांसह सूरतमध्ये हॉटेल ली मेरेडियनमध्ये.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0