प्रज्ञा ठाकूर यांचा नुपूर शर्मांच्या वक्तव्याला पाठिंबा

प्रज्ञा ठाकूर यांचा नुपूर शर्मांच्या वक्तव्याला पाठिंबा

नवी दिल्लीः भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावर केलेल्या अवमानजनक टीकेला मालेगांव बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी व भा

विधान परिषदेच्या ६ जागांसाठी १० डिसेंबरला मतदान
जीएसटीः ९७ हजार कोटींच्या प्रस्तावावर २१ राज्ये राजी
अमरावतीतील दंगलीला पोलिसांची अकार्यक्षमता जबाबदार!

नवी दिल्लीः भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावर केलेल्या अवमानजनक टीकेला मालेगांव बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी व भाजपच्या खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी पाठिंबा दिला आहे.

शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना ठाकूर यांनी भारत हा हिंदूंचा असून येथे सनातन धर्म चालतो. हा धर्म जिवंत कसा ठेवायचा याची जबाबदारी आमची असून आम्ही ते करत असल्याचे विधान केले.

नुपूर शर्मा यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याबाबत विचारले असता प्रज्ञा ठाकूर म्हणाल्या, अश्रद्धावान लोक हे नेहमीच असं करतात. कमलेश तिवारी काही वेगळं म्हणाला, आणि त्याला ठार मारण्यात आलं. कोणीतरी (नूपूर शर्मा) काही म्हणालं तर त्याला जीवे मारण्याच्या धमक्या येतात. ते आपल्या देवांची विटंबना करतात, सिनेमे काढतात, गेले कित्येक वर्षे हे चालले आहे, हीच त्यांची मानसिकता असल्याचे ठाकूर म्हणाल्या.

प्रज्ञा ठाकूर यांनी यापूर्वी वादग्रस्त विधाने केली आहेत. मे २०१९मध्ये लोकसभा निवडणुकांच्या प्रचारात त्यांनी नथुराम गोडसे देशभक्त होते, आहेत व राहतील असे वक्तव्य केले होते. त्यानंतर नोव्हेंबर २०१९मध्ये ठाकूर यांनी नथुराम गोडसे देशभक्त असल्याचे विधान संसदेत केले होते. त्यावेळी संसदेत गदारोळ माजला होता. यानंतर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती.

प्रज्ञा ठाकूर यांनी शुक्रवारी नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याला पाठिंबा देताना ज्या कमलेश तिवारी यांचा उल्लेख केला आहे, त्या तिवारींनी प्रेषित मोहम्मद पैगंबरांवर अवमानास्पद टीका केली होती. कमलेश तिवारी हे स्वतःला हिंदू महासभेचे कार्यकारी अध्यक्ष म्हणवून घेत होते. त्यांनी २०१२मध्ये हिंदू महासभेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती पण त्यात ते पराभूत झाले होते. आपल्या राजकीय वाटचालीत तिवारी यांनी प्रेषितांवर केलेल्या टिकेमुळे गदारोळ उडाला होता. या दरम्यान त्यांचा लखनौत १८ ऑक्टोबर २०१९मध्ये खून करण्यात आला होता. तिवारी यांचा खून कोणी केला याबाबत प्रसार माध्यमातून अनेक वृत्ते बाहेर आली होती. उ. प्रदेश पोलिसांनी तिवारी यांच्या खुनाला मुस्लिम धर्मगुरूंना जबाबदार धरले होते पण तिवारी यांच्या कुटुंबियांनी कमलेश तिवारी यांची हत्या स्थानिक भाजप नेत्यांकडून व सत्ताधारी आदित्यनाथ सरकारकडून झाल्याचा आरोप केला होता. तिवारी यांची आई व पुतण्याने स्थानिक भाजप नेता शिव कुमार गुप्ता याने कमलेशची हत्या केल्याचा जाहीर आरोप केला होता. एका मंदिर वादातून ही हत्या झाल्याचे त्यांच्या कुटुंबियांचे म्हणणे होते.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0