काश्मीरात १० दिवसांत पक्ष स्थापन होईलः गुलाम नबी आझाद

काश्मीरात १० दिवसांत पक्ष स्थापन होईलः गुलाम नबी आझाद

नवी दिल्लीः काँग्रेस पक्षाचा त्याग केलेले जम्मू व काश्मीरमधील एक नेते गुलाम नबी आझाद यांनी येत्या १० दिवसांत आपण नवा पक्ष काढणार असल्याचे जाहीर केले.

२०११च्या देशद्रोहाच्या खटल्यातून सोनी सोरी निर्दोष
दिल्ली दंगलीत नेत्यांचा सहभाग नाही – पोलिस
वैद्यकीय उपकरणे लवकर मिळावी : डॉक्टर व वैज्ञानिकांचे आवाहन

नवी दिल्लीः काँग्रेस पक्षाचा त्याग केलेले जम्मू व काश्मीरमधील एक नेते गुलाम नबी आझाद यांनी येत्या १० दिवसांत आपण नवा पक्ष काढणार असल्याचे जाहीर केले. आपल्या पक्षाची विचारसरणी वेगळी असेल आणि जम्मू-काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा मिळावा यासाठी आपला पक्ष संघर्ष करेल असे आझाद म्हणाले.

रविवारी आझाद यांनी बारामुल्ला येथे एका सार्वजनिक सभेत आपला पक्ष येत्या १० दिवसांत स्थापन होईल अशी उपस्थितांसमोर घोषणा केली. या वेळी त्यांनी जम्मू व काश्मीर केंद्रशासित प्रदेशाला पुन्हा राज्याचा दर्जा मिळावा म्हणून आपला पक्ष संघर्ष करेल. राज्यातल्या जनतेला नोकरीसाठी आरक्षण असावे ही पक्षाची मागणी असेल. ३७० कलम संदर्भात जनतेची दिशाभूल टाळण्यासाठी प्रयत्न करेल असे मुद्दे मांडले. आपला पक्ष किंवा काँग्रेस वा तृणमूल, राष्ट्रवादी, द्रमुक सारखे प्रादेशिक पक्ष ३७० कलम पुन्हा आणू शकत नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. आपला पक्ष जनतेची फसवणूक करू शकत नाही, जे आवाक्यात नाही ते करण्याचे आश्वासन जनतेला देऊ शकत नाही. संसदेत दोन तृतीयांश बहुमत असेल तरच काश्मीरला विशेष दर्जा मिळू शकतो, असेही आझाद यांनी सांगितले.

गेल्या १० वर्षांत काँग्रेसला राज्यसभेत ८५ जागांचा टप्पाही गाठता आला नाही. उलट प्रत्येक वर्षी काँग्रेसचे संख्याबळ घटत गेले. आणि या पुढे काँग्रेस ३५० जागांच्या पुढे जागा मिळवेल असेही वाटत नाही, असेही ते म्हणाले.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0