शेर-ए-काश्मीर क्रीडांगणाचे नाव बदलणार?

शेर-ए-काश्मीर क्रीडांगणाचे नाव बदलणार?

श्रीनगर : शहरातील सोनवर परिसरातील प्रसिद्ध अशा ‘शेर-ए-काश्मीर’ क्रीडांगणाचे नाव बदलून ते ‘सरदार पटेल’ क्रीडांगण करण्याचे सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. हे

‘अनिश्चित काळासाठीची इंटरनेटबंदी अयोग्य’
३७० कलमाच्या विरोधातील याचिकेतून नाव मागे घेण्यासाठी शाह फैजल यांचा अर्ज
‘आज जेवढे भय आहे ते पूर्वीही नव्हतं’

श्रीनगर : शहरातील सोनवर परिसरातील प्रसिद्ध अशा ‘शेर-ए-काश्मीर’ क्रीडांगणाचे नाव बदलून ते ‘सरदार पटेल’ क्रीडांगण करण्याचे सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. हे नामांतर येत्या १५ डिसेंबर रोजी होईल असे सूत्रांनी सांगितले. १५ डिसेंबरला देशाचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान सरदार पटेल यांची पुण्यतिथी असून या पुण्यतिथीचे औचित्य साधून नाव बदलण्यात येणार असल्याचे समजते. काश्मीरच्या संदर्भात नेहरुंपेक्षा सरदार पटेल यांची भूमिका अधिक आक्रमक राष्ट्रवादाची असल्याचे राजकारण भाजपला ठसवायचे असून त्यासाठी असे नामांतर केले जात आहे.

‘शेर-ए काश्मीर’ क्रीडांगणाच्या नामांतराबरोबरच शहरातील प्रसिद्ध लाल चौक, काही रस्ते, शहरातील मध्यवर्ती ठिकाणांचीही नावे बदलण्याचे प्रयत्न सरकारकडून सुरू आहेत. ही नावे स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांची असतील शिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील काही नेत्यांची असतील याची खबरदारी घेतली जाणार आहे. काही दिवसांपूर्वी ‘रेडिओ काश्मीर’चे नाव बदलून ‘ऑल इंडिया रेडिओ’ असे केले होते. तर गेल्या ऑक्टोबरमध्ये काश्मीरला जम्मूशी जोडणारा देशातील सर्वात मोठ्या बोगद्याचे -चेनानी-नाशरी बोगदा- नाव भारतीय जनसंघाचे संस्थापक श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या नावे असेल अशी घोषणा केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी केली होती.

‘शेर-ए-काश्मीर’ हे नाव काश्मीरचे सिंह मानले गेलेल्या शेख अब्दुल्ला यांच्या गौरवार्थ ठेवण्यात आले होते. या क्रीडांगणावर आजपर्यंत आंतरराष्ट्रीय पातळीवरचे क्रिकेटचे दोनच एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. एक सामना १३ ऑक्टोबर १९८३ रोजी भारत वि. वेस्ट इंडिज दरम्यानचा तर दुसरा ९ सप्टेंबर १९८९ रोजी भारत वि. ऑस्ट्रेलिया दरम्यान खेळला गेला होता. या मैदानावर अनेक स्थानिक व राज्य पातळीवरचे विविध खेळांच्या स्पर्धाचे आयोजन केले जात असते.

काही दिवसांपूर्वी सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३७० कलम रद्द व्हावे अशी सरदार पटेलांची इच्छा होती, असे वक्तव्य केले होते.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0