के. चंद्रशेखर राव नव्या पक्षासह राष्ट्रीय राजकारणात येणार

के. चंद्रशेखर राव नव्या पक्षासह राष्ट्रीय राजकारणात येणार

नवी दिल्लीः येत्या काही दिवसांत आपण राष्ट्रीय स्तरावरचा पक्ष स्थापन करणार असल्याचे विधान तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी रविवारी केले. आप

कीर्तनाचा ‘जात पॅटर्न’
हिंगणघाट पीडितेचा संघर्ष अखेर संपला
सरकारच म्हणतेय की एनपीआरचा एनसीआरशी संबंध

नवी दिल्लीः येत्या काही दिवसांत आपण राष्ट्रीय स्तरावरचा पक्ष स्थापन करणार असल्याचे विधान तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी रविवारी केले. आपल्या नव्या राष्ट्रीय पक्षाच्या ध्येयधोरणांसंदर्भात सध्या चर्चा सुरू असून देशातील नामवंत अर्थशास्त्रज्ञ, विचारवंत व प्रत्येक क्षेत्रातील दिग्गज यांच्या सूचनेतून हा पक्ष जन्मास येईल असे राव म्हणाले.

गेल्या महिन्याभरात राव यांनी आपण राष्ट्रीय राजकारणात सक्रीय राहणार असल्याचे संकेत दिले होते. भाजप व काँग्रेसला राष्ट्रीय स्तरावर पर्यायी पक्ष हवा असेही ते म्हणत आहेत. त्या पार्श्वभूमीवर रविवारी राव यांनी केलेली घोषणा त्यांच्या राष्ट्रीय राजकारणातील प्रवेशाची सुरूवात म्हणावी लागेल.

राव यांच्या नव्या पक्षाचे नाव भारतीय राष्ट्र समिती असे असण्याची शक्यता बोलली जात आहे. हा पक्ष सध्याच्या तेलंगण राष्ट्र समितीच्या रचनेसारखा असेल असेही सांगितले जात आहे.

राष्ट्रीय पक्ष स्थापनेच्या आधी राव यांनी जनता दल सेक्युलरच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. त्यांनी भाजपमुक्त भारतची गरज असल्याचेही वक्तव्य केले होते. देशात बेरोजगारी, महागाई सारख्या महत्त्वाच्या समस्या असल्याचेही त्यांनी वक्तव्य केले होते. राष्ट्रीय राजकारणात तेलंगण मॉडेल आणण्याची गरजही त्यांनी बोलून दाखवली होती. काही दिवसांपूर्वी नितीश कुमार यांची पटण्यात भेट घेतली होती. आता पक्ष स्थापन झाल्यानंतर राव हे प्रत्येक राज्यांचा दौरा करणार आहेत.

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0