नवी दिल्लीः उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या गुरुवारी झालेल्या पहिल्या टप्प्यांत ५८ टक्के मतदान झाले. हे मतदान ११ जिल्ह्यातल्या ५८ मतदारसंघात झाले.
नवी दिल्लीः उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या गुरुवारी झालेल्या पहिल्या टप्प्यांत ५८ टक्के मतदान झाले. हे मतदान ११ जिल्ह्यातल्या ५८ मतदारसंघात झाले. सकाळी ७ वाजता सुरू झालेले मतदान संध्याकाळी ६ वाजता संपले. या काळात कोठेही अनुचित प्रकार घडला नाही.
पहिल्या टप्प्यात ५८ मतदारसंघात ६२३ उमेदवार उभे असून त्यात ७३ महिला उमेदवार आहेत. या टप्प्यात राज्यातल्या २.२८ कोटी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
पहिल्या टप्प्यात राज्याचे काही मंत्री उभे आहेत. यात श्रीकांत शर्मा, सुरेश रैना, संदीप सिंग, कपिल देव अग्रवाल, अतुल गर्ग व चौधरी लक्ष्मी नरेन यांचा समावेश आहे.
पहिला टप्प्यातील मतदान जाट बहुल पश्चिम उ. प्रदेशात झाले. पंजाब पाठोपाठ या भागातून मोदी सरकारच्या तीन वादग्रस्त शेती कायद्यांना प्रखर विरोध झाला होता.
२०१७च्या विधानसभा निवडणुकांत पश्चिम उ. प्रदेशात ५८ पैकी ५३ जागांवर भाजपचा विजय झाला होता. तर समाजवादी पार्टी व बहुजन समाज पार्टीचे प्रत्येकी दोन व राष्ट्रीय लोक दलाचा एक उमेदवार निवडून आला होता.
मूळ वृत्त
COMMENTS