शाह फैसल यांचा राजकारणातून संन्यास

शाह फैसल यांचा राजकारणातून संन्यास

श्रीनगरः भारतीय प्रशासकीय सेवेतून राजीनामा देत जम्मू-काश्मीर पीपल्स मुव्हमेंट (जेकेपीएम) पक्ष स्थापन केलेले शाह फैसल यांनी आपल्याच पक्षाच्या अध्यक्षपद

लखीमपुर हिंसाचारः प्रमुख आरोपीचा जामीन फेटाळला
1984: टोकाला गेलेली हुकूमशाही आणि यंत्रवत मनुष्य
‘आत्मनिर्भर’मध्ये परदेशी विद्यापीठांना आमंत्रण का?

श्रीनगरः भारतीय प्रशासकीय सेवेतून राजीनामा देत जम्मू-काश्मीर पीपल्स मुव्हमेंट (जेकेपीएम) पक्ष स्थापन केलेले शाह फैसल यांनी आपल्याच पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. पक्षाने अधिकृतपणे ही माहिती सोमवारी दिली.

काश्मीरमधील परिस्थिती दैनंदिन बिघडत जात असून त्यामुळे आपण ही परिस्थिती सांभाळू शकत नाही, असे या राजीनाम्यामागचे कारण असल्याची माहिती पक्षाचे नेते फिरोज पिरझादा यांनी दिली. फैसल यांचे मन वळवण्याचे गेले महिनाभर प्रयत्न सुरू होते, पण त्यांनी आपला राजकीय संन्यासाचा निर्णय बदलण्यास नकार दिला, असे पिरझादा यांनी सांगितले.

२०१०मध्ये यूपीएससी परीक्षेत देशात पहिला क्रमांक पटकावणारे शाह फैसल यांनी जानेवारी २०१९मध्ये काश्मीरमधील सामान्य नागरिकाच्या होत असलेल्या हत्यांचा निषेध म्हणून सनदी सेवेचा राजीनामा देत राजकारणात शिरण्याचा निर्णय घेतला. त्यांनी अन्य कोणत्या पक्षात जाण्यापेक्षा स्वतःचाच जम्मू-काश्मीर पीपल्स मुव्हमेंट असा पक्ष स्थापन केला. आपल्या पक्षाच्या माध्यमातून काश्मीरमधील बिघडलेली परिस्थिती सुधारवण्याचे प्रयत्न केले जातील, आपले अन्य पक्षांसारखे पारंपरिक राजकारण नसेल, त्यात काश्मीरमधल्या युवकांना सामील करण्याचे प्रयत्न असतील, अशी त्यांची भूमिका होती. त्यांनी आपल्या पक्षाचे घोषवाक्य ‘हवा बदलेगी’ असेही ठेवले होते.

गेल्या वर्षी ३७० कलम रद्द केल्यानंतर फैसल यांनी केंद्र सरकारचा जोरकसपणे विरोध केला होता. काश्मीरमध्ये राजकीय शांतता प्रस्थापित होण्यासाठी तेथे अहिंसेवरील चळवळीची गरज आहे असे मत त्यांनी व्यक्त केले होते. पण १५ ऑगस्ट रोजी इस्तंबूल जात असताना फैसल यांना नवी दिल्ली विमानतळावर ताब्यात घेण्यात आले व त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले.

राजकारणाचा संन्यास घेतल्यानंतर फैसल शाह पुन्हा नोकरशाहीत जाण्याची वृत्ते आहेत पण त्यावर प्रतिक्रिया फैसल यांनी दिलेली नाही.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0