आझाद यांच्या राजीनाम्याचा भाजपला किती फायदा?

आझाद यांच्या राजीनाम्याचा भाजपला किती फायदा?

श्रीनगरः २६ ऑगस्ट रोजी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. त्यांच्या राजीनाम्यानंतर जम्मू व काश्मीर खोऱ्यात त्यांच

कर्नाटकातल्या हिजाब प्रकरणाची सुनावणी आज होणार
शासन बदललं, प्रशासन बदला!
महाराष्ट्र पोलिसांनी नुपूर शर्मा, नवीन जिंदालला समन्स बजावले

श्रीनगरः २६ ऑगस्ट रोजी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. त्यांच्या राजीनाम्यानंतर जम्मू व काश्मीर खोऱ्यात त्यांच्या काही समर्थक आमदारांनी व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आपापल्या पदाचे राजीनामे दिले. गुलाम नबी आझाद यांनी आपण भाजपमध्ये प्रवेश करणार नाही असे स्पष्ट केले पण ते आपला नवा पक्ष जम्मू व काश्मीरच्या राजकारणात जन्मास घालतील ही शक्यता अधिक आहे. काश्मीरात निवडणुका होतील अशी शक्यता गृहित धरल्याने आझाद आपला पक्ष लवकर जाहीर करतील असे वाटते. हा पक्ष प्रादेशिक असेल की राष्ट्रीय स्वरुपाचा असेल याबाबत मात्र अद्याप त्यांच्याकडून कोणतेच संकेत आलेले नाहीत.

आझाद यांच्या काँग्रेस पक्षाच्या राजीनाम्यानंतर काश्मीर खोऱ्यातील काँग्रेसमध्ये उभी फूटच पडलेली दिसते. त्यामुळे या फुटीचा सर्वाधिक तोटा काँग्रेसला व सर्वाधिक फायदा भाजपला होण्याची शक्यता दिसत आहे. जम्मू भागात भाजपने वर्चस्व मिळवले आहे त्यांना काश्मीर खोऱ्यात आपला विस्तार करायचा असल्याने तेथील राजकारणाशी संबंधित असलेला माजी मुख्यमंत्री जो हिंदू असो वा मुस्लिम भाजपच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. हा उमेदवार दिल्लीतील नरेंद्र मोदी सरकारचे अधिपत्य मानणारा हवा ही भाजपची अपेक्षा आहे.

आझाद मते खातील का?

२००५ ते २००८ या दरम्यान गुलाम नबी आझाद यांनी जम्मू व काश्मीरचे मुख्यमंत्रीपद भूषवले होते. या काळात त्यांनी राज्यातील सर्व पक्षांमधून मित्र मिळवले खरे पण मू चिनाब व पीर पंचाल या जम्मूमधील भागाच्या पुढे त्यांना आपला प्रभाव वाढवता आला नाही. त्यामुळे आता अशी भीती व्यक्त केली जातेय की, पीर पंचाल व चिनाब भागातली भाजपविरोधी मतांमध्ये ते फूट पाडू शकतात. वेगळ्या भाषेत सांगायचे झाल्यास काश्मीरमधील भाजपविरोधी लाट आझाद यांच्या गटामुळे रोखली जाऊ शकते, असे मत जम्मू विद्यापीठाच्या राज्यशास्त्राच्या माजी प्राध्यापक रेखा चौधरी यांनी व्यक्त केले. त्यांच्या मते आझाद यांच्या बंडखोरीमुळे जम्मूमध्ये भाजपला मोठ्या प्रमाणात फायदा होईल व काँग्रेसची अवस्था अतिशय वाईट होईल. त्यामुळे जम्मूत संपूर्ण भाजपचा प्रभाव वाढेल. आझाद काँग्रेसमध्ये असते व पक्षाने त्यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून घोषित केले असते तर जम्मू विभागाच्या काही भागात भाजपला आव्हान मिळाले असते. आता आझाद यांनी स्वतःचा पक्ष काढला तर त्याचा प्रभाव दोडा पट्टा, पूँछ राजौरी व जम्मूच्या मुख्य प्रदेशात दिसू शकतो. हा परिणाम मोठ्या प्रमाणावर दिसेल असे वाटत नाही कारण काश्मीरमध्ये असेही काही प्रादेशिक पक्ष आपला मतदार राखून आहेत.

ज्येष्ठ पत्रकार व राजकीय भाष्यकार झफर चौधरी यांच्या मते आझाद यांनी पक्ष काढल्यास तो जम्मू व काश्मीरमधील एक प्रभावशाली पक्ष ठरू शकतो. त्याचे कारण असे की आझाद यांच्या गटाकडे अनेक नेते आपल्या समर्थकांना जाऊन मिळतील व त्याने ताकद वाढेल.

सलमान निझामी या आझाद समर्थकाचे म्हणणे आहे की, आझाद हे राष्ट्रीय स्तरावरचे नेते असल्याने त्यांना जम्मू व काश्मीरची जनता सहज स्वीकारेल.

काश्मीरमधील काँग्रेसची स्थिती

२००२ ते २०१२ या काळात जम्मू व काश्मीरमध्ये काँग्रेसचे आघाडी सरकार सत्तेवर होते. आता आझाद यांच्या राजीनाम्यानंतर खोऱ्यातील अन्य १० महत्त्वाच्या नेत्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता या केंद्रशासित प्रदेशातील काँग्रेस कमकुवत होऊ लागली आहे.

२०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकानंतर या प्रदेशातील काँग्रेसची स्थिती नाजूक होत गेली. २०१४च्या लोकसभा निवडणुकांत उधमपूर लोकसभा मतदारसंघात आझाद यांना भाजपच्या जतिंद्र सिंग यांनी ६०,९७६ मतांनी पराभूत केले. आझाद यांची ही तिसरी लोकसभा निवडणूक होती. पहिली निवडणूक त्यांनी १९७७ साली लढली होती, त्यात ते ९५९ मतांनी विजयी झाले होते. त्यानंतर २००६च्या विधानसभा पोटनिवडणुकांत त्यांनी भाजपच्या उमेदवाराचा ५८,०१५ मतांनी पराभव केला होता.

भाजपच्या महत्त्वाकांक्षी योजना  

जम्मू व काश्मीरमध्ये मतदारसंघाची पुनर्रचना केल्यानंतर तेथे आता ९० जागा झाल्या असून त्यापैकी ४३ जागा जम्मू भागात व ४७ जागा काश्मीर खोऱ्याला विभागून दिल्या गेल्या आहेत.

भाजपचे जम्मू भागात ३० जागा जिंकण्याचे उद्दिष्ट्य असून ते साध्य केल्यास ते अन्य राजकीय पक्षांशी युती करून सत्ता स्थापन करू शकतात व त्यांचा स्वतःचा मुख्यमंत्री होऊ शकतो.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0