काश्मीरमध्ये चकमकीत ५ जवान ठार

काश्मीरमध्ये चकमकीत ५ जवान ठार

नवी दिल्लीः जम्मू व काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात सोमवारी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत ५ जवान ठार झाले. मृतांमध्ये एक ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसर आहे. पुं

आम्ही पर्यटक आहोत : विदेशी शिष्टमंडळाची काश्मीर भेट
जम्मू व काश्मीरमध्ये कलम ३११ची अंमलबजावणी
काश्मीरच्या तिघा छायाचित्रकारांना पुलित्झर सन्मान

नवी दिल्लीः जम्मू व काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात सोमवारी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत ५ जवान ठार झाले. मृतांमध्ये एक ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसर आहे.

पुंछ जिल्ह्यातील सुरकोटे येथील डेरा की गली या गावात काही दहशतवादी घुसल्याची माहिती मिळाल्यानंतर भारतीय लष्कराने मोहीम हाती घेतली होती. या दरम्यान झालेल्या चकमकीत दहशतवाद्यांनी मोठ्या प्रमाणात गोळीबार केला. यात भारतीय लष्करातील जेसीओसह अन्य ४ जवान ठार झाले, अशी माहिती लष्कराच्या प्रवक्त्याने दिली. हे पाचही जवान जागीच ठार झाल्याचे समजते. या चकमकीबाबत विस्तृत माहिती अद्याप मिळालेली नाही.

लष्करी सूत्रांच्या मते पुंछ जिल्ह्यातील चामरेर जंगलात मोठ्या प्रमाणात दहशतवादी जमा झाले असून त्यांच्याकडे अत्याधुनिक शस्त्रसाठा आहे. ही घुसखोरी पाकिस्तानातून झाली आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0