प्रसार भारती म्हणतेय, पीटीआय देशद्रोही

प्रसार भारती म्हणतेय, पीटीआय देशद्रोही

भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचे चीनमधील राजदूत विक्रम मिस्री यांनी, चीनच्या सैन्याने लडाखनजीक प्रत्यक्ष ताबा रेषेवरून आपल्या हद्दीत जायला हवे

युक्रेन प्रकरणात चीन किती गुंतलंय?
अरुणाचलमध्ये चीनने गांव वसवले
विळखा ड्रॅगनच्या बँकेचा

भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचे चीनमधील राजदूत विक्रम मिस्री यांनी, चीनच्या सैन्याने लडाखनजीक प्रत्यक्ष ताबा रेषेवरून आपल्या हद्दीत जायला हवे असे विधान केले होते. त्यांचे हे विधान पीटीआय या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केले होते. पण मिस्री यांचे हे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनने भारतात घुसखोरी केली नव्हती या विधानाला छेद देणारे ठरल्याने प्रसार भारती या सरकारी संस्थेने वृत्तसंस्था पीटीआयला देशद्रोही संबोधले असून या संस्थेशी असलेले संबंधही तोडण्याचा इशारा दिला आहे.

या संदर्भात विक्रम मिस्री वा परराष्ट्र खात्याने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही पण मिस्री यांच्या विधानाने सरकारची पंचाईत झाली होती. मिस्री यांचे आणखी एक विधान पीटीआयने प्रसिद्ध केले होते, त्यात त्यांनी चीनने प्रत्यक्ष ताबा रेषेनजीक भारताच्या हद्दीत चीनकडून घुसखोरी व सुरू असलेले बांधकाम थांबवावे असे म्हटले होते. त्यांचे हेही विधान मोदी यांच्या चीनने भारतीय हद्दीत घुसखोरी केली नसल्याच्या विधानाला छेद देणारे होते.

पीटीआयने मिस्री यांचे आणखी एक ट्विट प्रसिद्ध केले होते पण ते शनिवारी डिलीट केले गेले..

पीटीआयने मिस्री यांचे आणखी एक ट्विट प्रसिद्ध केले होते पण ते शनिवारी डिलीट केले गेले..

पीटीआयने मिस्री यांचे आणखी एक ट्विट प्रसिद्ध केले होते पण ते शनिवारी डिलीट केले गेले. दरम्यान, या गदारोळात परराष्ट्र खाते व मिस्री यांनी आपल्या विधानाचा विपरित अर्थ लावला असे काही म्हटलेले नाही.

मिस्री यांचा हवालाच देऊन पीटीआयने म्हटले होते की, प्रत्यक्ष ताबा रेषेवरचा तणाव कमी करायचा असेल तर चीनने आपली नवी बांधकामे रोखणे गरजेचे आहे.

या सर्व घडामोडींवरून वाटतेय की पीटीआय व सरकारमध्ये शनिवारी संध्याकाळी एक सहमती होऊन मिस्री यांच्या विधानांना बातम्यांमधून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0