नवी दिल्लीः आयुष मंत्रालयाची परवानगी न घेता कोरोनावर आपले औषध गुणकारी असल्याचा दावा करणार्या पतंजली आयुर्वेद कंपनीचे सर्वेसर्वा रामदेव बाबा यांच्याविर
नवी दिल्लीः आयुष मंत्रालयाची परवानगी न घेता कोरोनावर आपले औषध गुणकारी असल्याचा दावा करणार्या पतंजली आयुर्वेद कंपनीचे सर्वेसर्वा रामदेव बाबा यांच्याविरोधात शनिवारी राजस्थान पोलिसांनी फिर्याद दाखल केली आहे. रामदेवबाबा यांच्या व्यतिरिक्त पतंजली आयुर्वेद कंपनीचे सीईओ आचार्य बाळकृष्ण, निम्स विद्यापीठाचे संचालक बी. एस. तोमर, त्यांचा मुलगा अनुराग तोमर, वरिष्ठ शास्त्रज्ञ अनुराग वर्षण्वे यांच्याविरोधातही फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
गेल्या आठवड्यात गुरुवारी पतंजली आयुर्वेदने कोरोनावर कोरोनील व श्वासरी अशी दोन औषधे विकसित करण्यात आल्याचा दावा केला होता. या दाव्यात त्यांनी कोरोनाचे रुग्ण १०० टक्के बरे होऊन ७ दिवसांत आपल्या घरी गेल्याचेही सांगितले होते.
पण जेव्हा पतंजलीचा दावा सार्वजनिक झाला तेव्हा त्यांनी आयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्वांचे काहीच पालन न केल्याचेही उघड झाले व आयुष मंत्रालयाने पतंजलीला सर्व संशोधन पुरावे सादर करण्यास सांगितले.
जयपूरमधील वकील बलराम जाखड यांनी रामदेव बाबा व अन्य चौघांवर फिर्याद दाखल केली आहे. तसेच अन्य पोलिस ठाण्यांमध्येही रामदेव बाबा व बाळकृष्ण यांच्यावर फिर्यादी दाखल झाल्याचे डेप्यु. कमिशनर अशोक गुप्ता यांनी सांगितले.
मूळ बातमी
COMMENTS