‘न्यायाधीशांच्या विधानांमुळे जनतेचा विश्वास उडतोय’

‘न्यायाधीशांच्या विधानांमुळे जनतेचा विश्वास उडतोय’

नवी दिल्लीः ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांच्या दोन ट्विट वरून सर्वोच्च न्यायालयाला आपला अवमान होतो असे वाटत असेल तर लोकशाहीचा एक स्तंभ आतून किती पोक

न्यायाधीशांवर टीका: माजी न्या. कर्णन यांना अटक
कुणाल कामरांवर बेअदबी कारवाईस परवानगी
कार्टूनिस्टवर बेअदबीची कारवाई करण्यास संमती

नवी दिल्लीः ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांच्या दोन ट्विट वरून सर्वोच्च न्यायालयाला आपला अवमान होतो असे वाटत असेल तर लोकशाहीचा एक स्तंभ आतून किती पोकळ झाला आहे, हे यातून दिसून येते, असे मत ज्येष्ठ पत्रकार, लेखक, माजी केंद्रीय मंत्री व भाजपचे एक नेते अरुण शौरी यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले आहे. न्यायालय जर त्यांच्यावरील टीकेने अपमानित होत असेल तर कायद्यानुसार समोरच्या व्यक्तिला त्याची बाजू सांगण्याची संधी दिली जावी कारण सत्यच बचाव करू शकते, असे शौरी म्हणाले.

शौरी यांनी सर्वोच्च न्यायालयाने काश्मीर, एन्काउंटर हत्या, सीएएसारख्या महत्त्वाच्या विषयांकडे दुर्लक्ष केल्याचाही आपल्या मुलाखतीत आरोप केला.

प्रशांत भूषण प्रकरणावरून शौरी म्हणालेः जर सर्वोच्च न्यायालय स्वतःला सुरक्षित समजत नसेल तर ते आपले कसे संरक्षण करणार? न्यायालयाला या दोन ट्विटवरून आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली प्रतिमा खराब झाल्याचे वाटत आहे. वास्तविक लोकशाहीचे उदाहरण म्हणून भारताकडे पाहिले जाते पण हे ट्विट लोकशाहीच्या एका स्तंभाला आतून कमकुवत करत आहेत. व्यंगात्मक टीका ही समजून घेतली पाहिजे.

जर जाहिरातदार कंपन्यांनी व्यंग, विसंगती आपल्या जाहिरातीतून वगळली तर उत्पादनाची जाहिरात चांगली बनू शकणार नाही. ट्विटर हा प्लॅटफॉर्म इतका शक्तिशाली आहे की त्यावर केलेल्या ट्विटमुळे जगातील सर्वात शक्तीशाली लोकशाहीतील एक स्तंभ हादरून गेला आहे, असे वाटत असल्याचे शौरी म्हणाले.

शौरी पुढे म्हणाले, भूषण यांच्या ट्विटमुळे नव्हे तर तीन न्यायाधीशांच्या टिपण्णींमुळे लोकांचा सर्वोच्च न्यायालयावरचा विश्वास कमी होत चालला आहे. न्यायालयाच्या निर्णयांवर टीका वा मत देणे हे अवमान करण्यासारखे नसते. खुद्ध न्यायालयाने असे अनेक निर्णय पूर्वी दिले आहेत ज्यात तर्काला मूठमाती दिली होती. न्या. लोया संशयास्पद मृत्यू प्रकरण व रफाल प्रकरणात न्यायालयाने महत्त्वपूर्ण साक्षीदारांकडे दुर्लक्षच केले होते. नागरिकांना न्यायाचे महत्त्व कळते, त्याच्या दृष्टीने न्यायाधीशाचे कार्य महत्त्वाचे नसते, असेही शौरी म्हणाले.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0