हे तर स्वयंघोषित रक्षक : प्रसून जोशी, कंगनाचे प्रत्युत्तर

हे तर स्वयंघोषित रक्षक : प्रसून जोशी, कंगनाचे प्रत्युत्तर

मुंबई : दोन दिवसांपूर्वी झुंडशाहीला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशातल्या ४९ मान्यवरांनी पत्र लिहिले होते. या पत्राला शुक्रवारी बॉलीवूड व अन

दशक फुकुशिमा अणुदुर्घटनेचे- भागः २
सार्वजनिक क्षेत्र, कार्यक्षमता व डाव्यांची युनियन वगैरे
मित्राचे घर कुठे आहे?

मुंबई : दोन दिवसांपूर्वी झुंडशाहीला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशातल्या ४९ मान्यवरांनी पत्र लिहिले होते. या पत्राला शुक्रवारी बॉलीवूड व अन्य क्षेत्रातील ६१ जणांनी प्रत्युत्तर दिले असून ४९ मान्यवरांचा सरकारविरोधातील हा ठरवून केलेला आलाप असून तो खोटा प्रचार असल्याची टीका या ६१ जणांनी केली आहे.

या कलाकारांमध्ये प्रसिद्ध सिनेअभिनेत्री कंगना रनोट, सिनेकवी प्रसून जोशी, नृत्यांगना सोनल मानसिंग, चित्रपट दिग्दर्शक मधूर भांडारकर, विवेक अग्निहोत्री यांच्यासह अन्य क्षेत्रातील व्यक्ती आहेत. झुंडशाहीबद्दल सरकारला जाब विचारणे स्वत:ला स्वयंघोषिक रक्षक समजत असून त्यांची भूमिका पक्षपाती व विशिष्ट राजकीय उद्दिष्टातून आलेली आहे अशी टीका या पत्रात केली आहे.

या ४९ मान्यवरांनी असे पत्र लिहून भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिमा कलंकीत केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या पद्धतीने देशाच्या विकासासाठी अथक प्रयत्न करत आहेत, जे ज्या पद्धतीने प्रशासन सांभाळत आहे, त्यांच्या प्रयत्नामुळे देशात सकारात्मक राष्ट्रवाद व मानवतावाद निर्माण होत असताना त्याबद्दल नकारात्मकता पसरवण्याचे काम ही मंडळी करत असल्याचा आरोप या पत्रात केला गेला आहे.

काश्मीरमध्ये फुटीरतावादी शैक्षणिक संस्था जाळण्याची भाषा करत होते, देशाचे ‘टुकडे-टुकडे’ करण्याच्या घोषणा दिल्या जात होत्या, त्यावेळी या मंडळींनी मौन का पाळले होते, असा सवाल या पत्रात करण्यात आला आहे.

या पत्रावर शांतीनिकेतन विश्वभारतीतील विचारवंत देबशिश भट्‌टाचार्य, अवध विद्यापीठाचे कुलगुरू मनोज दीक्षित, श्यामा प्रसाद मुखर्जी रिसर्च संस्थेचे अनिर्बन गांगुली, पत्रकार व खासदार स्वपन दासगुप्ता व अभिनेता विश्वजीत चॅटर्जी यांच्याही स्वाक्षऱ्या आहेत.

संपूर्ण पत्राची लिंक

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 1