गंगेच्या पातळीत वाढ; तरंगताना आढळले मृतदेह

गंगेच्या पातळीत वाढ; तरंगताना आढळले मृतदेह

नवी दिल्लीः मान्सूनमुळे दुसर्या कोविड-१९च्या लाटेत गंगेच्या विविध किनार्यांवर पुरलेले मृतदेह अनेक ठिकाणी तरंगताना दिसत आहे. हे दृश्य प्रयागराज येथील ग

उद्योगस्नेही राजकीय शक्तीचा अभाव
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांत करोनामुळे बंदसदृश परिस्थिती
एनपीआरला कायदेशीर आधार नाही

नवी दिल्लीः मान्सूनमुळे दुसर्या कोविड-१९च्या लाटेत गंगेच्या विविध किनार्यांवर पुरलेले मृतदेह अनेक ठिकाणी तरंगताना दिसत आहे. हे दृश्य प्रयागराज येथील गंगेच्या विविध घाटांवर दिसून येत आहे. मृतदेह तरंगतानाचे अनेक फोटो व व्हीडिओ सोशल मीडियात २३ व २४ जून रोजी दिसून आले. या दिवसांत सुमारे ४० हून अधिक मृतदेह तरंगताना दिसल्याचे जिल्हा प्रशासनाच्या एका अधिकार्याने मान्य केले.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार प्रयागराज येथे २३ व २४ जून रोजी काही मच्छिमार मासेमारीसाठी गेले असताना त्यांना तरंगताना मृतदेह दिसून आले. हे मृतदेह काहींनी आपल्या मोबाइल कॅमेर्यात तर काहींनी त्याचे व्हीडिओ चित्रित केले. हे सर्व मृतदेह कोविड-१९च्या दुसर्या लाटेत गंगेच्या किनार्यावर पुरण्यात आल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. एका मृतदेहाच्या हातात सर्जिकल ग्लोव्ह होते तर एका मृतदेहाच्या तोंडात ऑक्सिजनची ट्यूब होती. बहुतांश मृतदेह कुजलेले दिसत नव्हते. याचे एक कारण असे असावे की हे मृतदेह काही दिवसांपूर्वीच पुरलेले असावेत.

प्रयागराज महानगरपालिकेचे झोनल अधिकारी नीरज कुमार सिंग यांनी सांगितले की, ज्या मृतदेहाच्या तोंडात ऑक्सिजनची नळी होती, त्याला त्यांच्या नातेवाईंकांनी आहे त्या अवस्थेत पुरले असण्याची शक्यता आहे.

प्रयागराजच्या महापौरांनीही या घटनेची दखल घेत तरंगणार्या मृतदेहांवर अंतिम संस्कार करण्यात येतील असे सांगितले.

दरम्यान उ. प्रदेश व बिहारमध्ये कोविड-१९मुळे मरण पावलेल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या राज्यांचे सरकार कोविड-१९ मृतांचा आकडा लपवत असल्याची वृत्ते प्रसिद्ध होत आहेत. ‘आर्टिकल -14’ या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार उ. प्रदेशामधील २४ जिल्ह्यांमधील सरकारकडून सांगण्यात येत असलेला कोविड-१९ मधील मृतांचा आकडा प्रत्यक्षात ४३ टक्के अधिक असून ही आकडेवारी दुसरी लाट येण्याअगोदरचा आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0