लक्षद्वीपमध्ये शाळांची सुटी रविवारी केल्याने संताप

लक्षद्वीपमध्ये शाळांची सुटी रविवारी केल्याने संताप

नवी दिल्लीः लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशात प्रशासनाने शाळांची साप्ताहिक सुटी शुक्रवार ऐवजी रविवार केल्याने रोष उफाळून आला आहे. लक्षद्वीपमध्ये ९६ टक

लॉकडाऊनमुळे देशाची अर्थव्यवस्था संकटातः राजपक्षे
भाजपच्या दबावामुळे फेसबुकने १४ पेज हटवले
बिहार निकालानंतर काँग्रेसमधली पडझड

नवी दिल्लीः लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशात प्रशासनाने शाळांची साप्ताहिक सुटी शुक्रवार ऐवजी रविवार केल्याने रोष उफाळून आला आहे. लक्षद्वीपमध्ये ९६ टक्के लोकसंख्या मुस्लिम असून गेली सहा दशके या केंद्रशासित प्रदेशात शुक्रवार ही शाळांची साप्ताहिक सुटी असते.

१७ डिसेंबरला शालेय प्रशासनाने एक आदेश प्रसिद्ध करत शाळांच्या नव्या वेळा व शाळांमधील दैनंदिन उपक्रमांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेताना जिल्हा पंचायत, लोकप्रतिनिधी व अन्य संस्थांशी चर्चा करण्यात आली नव्हती, असा आरोप लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल यांनी केला. हा निर्णय एकतर्फी व लक्षद्वीपची जनता असे निर्णय खपवून घेणार नाही, असेही ते म्हणाले.

शालेय प्रशासनाच्या या निर्णयाने या बेटावर शुक्रवारी सुरू असलेली मदरसा व्यवस्था विस्कळीत होईल, असे फैजल यांचे म्हणणे आहे.

दरम्यान हा निर्णय बदलावा यासाठी लक्षद्वीपचे प्रशासक प्रफुल खोडा पटेल यांच्या सल्लागारांना लक्षद्वीप जिल्हा पंचायतीचे उपाध्यक्ष पी, पी. अब्बास यांनी एक पत्र पाठवले असून या पत्रात लक्षद्वीपच्या जनतेच्या भावना लक्षात घ्याव्यात अशी विनंती केली आहे. लक्षद्वीपमध्ये बहुसंख्य मुस्लिम असून शुक्रवारी जुम्मा नमाज असतो. ही धार्मिक प्रथा तोडता येणे अशक्य आहे. त्यामुळे या निर्णयाबाबत चर्चा करण्यासाठी लोकप्रतिनिधी व समाजातील जबाबदार व्यक्तींना बोलवावे अशी विनंती केली आहे.

लक्षद्वीपच्या प्रशासकपदी प्रफुल खोडा पटेल यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या मुस्लिमविरोधी निर्णयाने जनतेमध्ये अनेक तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: