जम्मूः जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात जम्मू विभागाच्या सुमारे २० हजार वीज कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने या केंद्रशासित प्रदेशातील वीज सेवा विस्
जम्मूः जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात जम्मू विभागाच्या सुमारे २० हजार वीज कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने या केंद्रशासित प्रदेशातील वीज सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे सरकारने लष्कराची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारपासून हा संप सुरू झाला आहे.
वीज कर्मचाऱ्यांचा संप हा खासगीकरणाच्या विरोधात आहे. या संदर्भात वीज कर्मचारी संघटनांच्या दोन बैठका सरकारसोबत झाल्या होत्या पण त्या निष्फळ ठरल्या. त्यामुळे वीज विभागाचे लाइनमन ते वरिष्ठ अभियंतांनी बेमुदत संप पुकारला आहे. या संपामुळे रविवारी जम्मू-काश्मीरमधील सुमारे ५० टक्के भागांत वीज गायब होती.
गेल्या ४ डिसेंबरला जम्मू-काश्मीर प्रशासनाने पॉवर डिस्ट्रिब्युशन कॉर्पोरेशन लिमिटेड व पॉवर ट्रान्समिशन कॉर्पोरेशन लिमिटेड या दोन संघटनांच्या विलिनीकरणाची घोषणा केली होती. प्रशासनाचा हा निर्णय खासगीकरणाच्या दृष्टीने पाऊल असल्याचा वीज कर्मचाऱ्यांचा आरोप आहे.
रविवारी सर्व जिल्ह्यांमध्ये वीज मंडळाच्या कार्यालयापुढे शेकडो कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली होती. आमचा संघर्ष सुरू राहील असे संघटनांचे म्हणणे आहे.
मूळ बातमी
COMMENTS