सार्वजनिक कंपन्यांचे पीएम केअरला २,१०५ कोटी दान

सार्वजनिक कंपन्यांचे पीएम केअरला २,१०५ कोटी दान

नवी दिल्लीः देशातल्या ३८ सार्वजनिक उद्योगांनी पीएम केअर्स फंडमध्ये २,१०५ कोटी रु. देणगी दिल्याची माहिती इंडियन एक्स्प्रेसने दाखल केलेल्या माहिती अधिका

येडियुरप्पा सरकार विधानसभेत उत्तीर्ण
शेतकऱ्यांबद्दल आदर? आठवून बघा भाजप नेत्यांची विधाने!
अहिंसकतेची नैतिकता व मध्यमवर्गीय उदारमतवादी प्रवृत्ती

नवी दिल्लीः देशातल्या ३८ सार्वजनिक उद्योगांनी पीएम केअर्स फंडमध्ये २,१०५ कोटी रु. देणगी दिल्याची माहिती इंडियन एक्स्प्रेसने दाखल केलेल्या माहिती अधिकारातून उघडकीस आली आहे.

या पीएम केअर्स फंडमध्ये ओएनजीसी, इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी), एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, ऑइल इंडिया व कोल इंडिया या सार्वजनिक उद्योगांनी अधिक देणगी दिली आहे.

पीएम केअर्स फंड हा पब्लिक ऑथॉरिटी नसल्याने तो माहिती अधिकार कक्षात येत नसल्याचे कारण दाखवत त्यामध्ये कोणी देणगी दिली आहे, याची माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून दिली जात नाही. पण इंडियन एक्स्प्रेसने ५५ सार्वजनिक उद्योगांचा पीएम केअरमधील किती वाटा आहे, याचा माहिती अधिकार अर्ज दाखल केला होता. अखेर १३ ऑगस्टला सरकारने ३८ सार्वजनिक उद्योगांकडून मिळालेल्या देणग्यांची माहिती दिली आहे.

या देणग्यांमध्ये सर्वाधिक देणगी ओएनजीसीने ३०० कोटी रु. दिली असून त्यानंतर एनटीपीसीने २५० कोटी रु., इंडियन ऑइलने २२५ कोटी रु., पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन अँड पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने २०० कोटी रु. देणगी दिली आहे.

तर एचपीसीएल, एनएमडीसी, आरईसी, बीपीसीएल व कोल इंडिया या उद्योगांनी १०० कोटी रु.हून अधिक देणगी दिली आहे.

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या माहितीनुसार बहुसंख्य सार्वजनिक उद्योगांनी पीएम केअर्स फंडला दिलेली देणगी ही त्यांच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) फंड मधून दिली आहे. हा फंड २०१९-२० सालातील असून ओएनजीसी, एचपीसीएल यासारख्या उद्योगांनी २०२०-२१ सालचा त्यांना मंजूर न झालेल्या सीएसआर फंडातून देणगी दिली आहे. तर पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनने एक पाऊल पुढे टाकत २०२०-२१ चा त्यांना मंजूर झालेल्या सीएसआर फंडापेक्षा (१५० कोटी रु.) अधिक रक्कम म्हणजे २०० कोटी रु. पीएम केअर्समध्ये जमा केली आहे.

ऑइल इंडियाने २०१९-२० व २०२०-२१ या दोन सीएसआर फंडामधील अनुक्रमे १३ कोटी रु. व २५ कोटी रु. पीएम केअर्सला दिले आहेत. तसेच रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशने १०० कोटी रु. व ५० कोटी रु. पीएम केअर्स फंडला दिले आहेत.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0