पुलित्झर विजेत्या सना मट्टूला परदेशात जण्यापासून रोखले

पुलित्झर विजेत्या सना मट्टूला परदेशात जण्यापासून रोखले

२०२२ सालासाठी 'फीचर फोटोग्राफी श्रेणी' मध्ये प्रतिष्ठित पुलित्झर पारितोषिक जिंकणारी काश्मिरी फोटो पत्रकार सना इर्शाद मट्टू भारतातून फ्रान्सला जाणार होती. तिच्याकडे वैध व्हिसा असूनही कोणतेही कारण न देता इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी तिला आंतरराष्ट्रीय प्रवास करता येत नसल्याचे सांगून रोखले.

भारतामध्ये होऊ शकतात पाऊण कोटी मृत्यू
स्विस खात्यांचे तपशील देण्यास सरकारचा नकार
लिंचिंगसाठी जन्मठेप, उ. प्रदेश कायदा आयोगाची सूचना

नवी दिल्ली: छायाचित्रांसाठी २०२२ चा पुलित्झर पुरस्कार जिंकणारी काश्मिरी छायाचित्रकार सना इर्शाद मट्टू हिला वैध फ्रेंच व्हिसा असूनही इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी दिल्लीहून पॅरिसला जाण्यापासून रोखले.

मट्टूने एका ट्विटमध्ये म्हटले आहे, की ‘सेरेंडिपिटी आर्ल्स ग्रँट 2020’च्या दहा विजेत्यांपैकी एक म्हणून ती पुस्तक प्रकाशन आणि छायाचित्र प्रदर्शनाला उपस्थित राहण्यासाठी फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे जात होती. अधिकार्‍यांनी तिला देश सोडून जाण्याची परवानगी न देण्याचे कारण न सांगता केवळ सांगितले, की ती आंतरराष्ट्रीय प्रवास करू शकत नाही.

मे २०२२ मध्ये, फ्रीलान्स छायाचित्रकार मट्टू यांच्या रॉयटर्सने प्रकाशित केलेल्या त्यांच्या फोटोंसाठी ‘फीचर फोटोग्राफी श्रेणीती’ल पुलित्झर पारितोषिक जिंकले आहे.

रॉयटर्स टीमचे दिवंगत फोटो पत्रकार दानिश सिद्दीकी, अमित दवे आणि अदनान अबिदी यांच्यासह ‘फीचर फोटोग्राफी श्रेणी’मध्ये मट्टू यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला. भारतातील कोविड-19 संकटाच्या दरम्यान केलेल्या उल्लेखनीय छायाचित्रणाबद्दल या छायाचित्रकारांना हा पुरस्कार मिळाला आहे.

‘सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ काश्मीर’मधून कन्व्हर्जंट जर्नालिझममध्ये पदव्युत्तर पदवी घेतलेल्या सनाने काढलेली छायाचित्रे जगभरातील अनेक वृत्तसंस्थांमध्ये प्रसिद्ध झाली आहे. २०२१ मध्ये, तिला प्रतिष्ठित मॅग्नम फाउंडेशनची फेलोशिप देखील मिळाली आहे.

काश्मिरी पत्रकाराला कोणतीही माहिती न देता देश सोडण्यापासून रोखण्याची ही पहिलीच वेळ नाही. केंद्र सरकारने कलम ३७० रद्द केल्यानंतर लगेचच सप्टेंबर २०१९ मध्ये, पत्रकार-लेखिका गौहर गिलानी यांना नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉन (जर्मनी) येथे जाण्यास मनाई करण्यात आली होती.

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0