कोरोनावर लस मिळाल्याचा पुतीन यांचा दावा

कोरोनावर लस मिळाल्याचा पुतीन यांचा दावा

मॉस्कोः कोविड-१९वरील जगातील पहिली लस शोधून काढल्याचा दावा मंगळवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी केला. ही लस कोरोना रुग्णावर परिणामकारक ठरली अ

स्वीडनचा लॉकडाऊनला नकार, समाजावर जबाबदारी
आता देशातल्या ७५ कोरोना हॉटस्पॉट जिल्ह्यांवर लक्ष
पाकिस्तानने कोरोना कसा नियंत्रित केला?

मॉस्कोः कोविड-१९वरील जगातील पहिली लस शोधून काढल्याचा दावा मंगळवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी केला. ही लस कोरोना रुग्णावर परिणामकारक ठरली असून त्याने रुग्णामध्ये प्रतिकारक शक्ती वाढली असल्याचे सांगत पुतीन यांनी ही लस आपल्या मुलीने घेतली होती व त्यानंतर तिला प्रत्येक डोसनंतर ताप आला, आता तिला बरे वाटत असल्याचे सांगितले.

सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार ही लस मॉस्कोस्थित गमालेया इन्स्टिट्यूटने तयार केली असून तिचे नाव Sputnik-V असे ठेवले आहे. १९५७मध्ये तत्कालिन सोव्हिएट रशियाने जगातील पहिला उपग्रह अवकाशात सोडला होता त्याचे नाव स्पूटनिक होते.

Sputnik-V लस ही अजून तिसर्या टप्प्यातून गेलेली नाही त्यामुळे तिचा परिणाम हजारो कोविड रुग्णांवर किती होऊ शकतो याची माहिती मिळण्यास थोडा वेळ जाणार आहे. पण रशियाच्या आरोग्य मंत्र्यांनी ज्या कोरोना रुग्णांवर या लसीचे प्रयोग केले, त्या सर्वांच्या शरीरात उत्तम रोगप्रतिकारक शक्ती तयार झाली, शिवाय त्यांच्या शरीरात अन्य कोणत्याही समस्या तयार झाल्या नाहीत, असे सांगितले.

रशियाने लसीच्या घेतलेल्या शास्त्रीय चाचण्यांचीही माहिती उघड केलेली नाही. तरीही पुतीन यांच्या या दाव्यानंतर २० देश व काही अमेरिकी कंपन्यांनी ही लस विकत घेण्यास उत्सुकता दाखवली आहे. हे २० देश लॅटिन अमेरिका, आशिया, मध्यपूर्व आशियातील देश असून त्यांच्याकडून १ अब्ज लसीची मागणी आली असल्याचा दावा गमालेया इन्स्टिट्यूटला आर्थिक मदत करणार्या रशियन डायरेक्ट इन्व्हस्टेमेंट फंडचे संचालक किरील दिमित्रिव्ह यांनी केला.

Sputnik-V या लसीच्या चाचणीचा तिसरा व अखेरचा टप्पा बुधवारपासून रशियात सुरू केला जाणार आहे.

दाव्यावर साशंकता

कोविड-१९ वरची जगातील पहिली लस विकसित केल्याच्या पुतीन यांच्या दाव्यावर मात्र साशंकतेने पाहिले जात आहे. गेली अनेक वर्षे पाश्चिमात्य जगत, अमेरिका यांच्याशी रशियाशी असलेल्या तणावाच्या संबंधामुळे रशियाच्या जगातील स्थानाला बरेच धक्के बसले आहे. रशियाचा आर्थिक विकासालाही याची झळ बसली आहे. यातून आपल्या देशाला बाहेर काढण्यासाठी व रशिया जगातील शास्त्रीयदृष्ट्या प्रगत देश आहे, हे ठसवण्यासाठी पुतीन यांनी लस विकसित केल्याची घोषणा केली आहे, असे अनेक राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

कोविड-१९ महासाथीची घोषणा झाल्यानंतर रशियाने कोविड-१९ लसीच्या तिसर्या टप्प्यातील चाचण्यांचा निकष बाजूला ठेवला. या दुरुस्तीमुळे संशोधकांना वेगाने लस संशोधनावर काम करता येणे शक्य झाले. पण या वेगवान पद्धतीवर अनेक तज्ज्ञांची नाराजी आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0