राहुल गांधींना पोलिसांची धक्काबुक्की

राहुल गांधींना पोलिसांची धक्काबुक्की

नवी दिल्लीः हाथरस बलात्कार प्रकरणातील मृत तरुणीच्या कुटुंबियांना भेटण्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी व उ. प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी

पीएम केअर फंडाबाबत केंद्राला सर्वाधिकार
मध्य प्रदेशात ‘लव्ह जिहाद’ विधेयक
‘लडाखमध्ये विकासासाठी फारुख अब्दुल्लांना समर्थन’

नवी दिल्लीः हाथरस बलात्कार प्रकरणातील मृत तरुणीच्या कुटुंबियांना भेटण्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी व उ. प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांचा प्रयत्न उ. पोलिसांनी गुरुवारी हाणून पाडला. यात पोलिसांनी राहुल गांधी यांना धक्काबुक्कीही केली. त्यात राहुल गांधी जमिनीवरही पडले. या घटनेने संतप्त झालेल्या काँग्रेसच्या कार्यकर्तांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर चौफेर टीका केली. उ. प्रदेशसह काँग्रेसशासित राज्यांमध्ये कार्यकर्ते रस्त्यावर आले व त्यांनी केंद्र व उ. प्रदेश सरकारचा निषेध केला. योगींनी उ. प्रदेशात जंगलराज आणल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. तर प्रियंका गांधी यांनी योगी सरकार दमनकारी असल्याचा आरोप केला.

गुरुवारी दुपारी नवी दिल्लीतून राहुल व प्रियंका आपल्या कार्यकर्त्यांच्या ताफ्यासह हाथरस बलात्कार प्रकरणातील पीडित मुलीच्या भूलगडी या गावांकडे जात असताना उ. प्रदेशच्या सीमेवर, ग्रेटर नॉयडा येथे हा ताफा पोलिसांनी अडवला. त्यावर राहुल व प्रियंका यांनी पायी चालत आपण भूलगडीला जाणार असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यावर पोलिसांनी १४४ कलम असल्याने आपण जाऊ शकत नाही, असे राहुल यांना सांगितले. पण राहुल यांनी, आपण एकटे १४२ किमी अंतर चालत तिकडे जात असून १४४ कलमाचे उल्लंघन होऊ शकत नाही, असा मुद्दा मांडला. त्यावर पोलिसांनी आपण सार्वजनिक व्यक्तिमत्व, नेते असल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो असे सांगितले. पण पोलिसांच्या या म्हणण्याला विरोध करत राहुल यांनी कडे तोडण्याचा प्रयत्न केला. त्यात एका पोलिसाने त्यांना धक्काबुक्की केली, त्यामध्ये राहुल गांधी जमिनीवर पडले.

काँग्रेसच्या आक्रमक कार्यकर्त्यांनी यमुना आग्रा हायवेवरील वाहतूक रोखून धरली. नंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना हटवून हा महामार्ग मोकळा केला. राहुल व प्रियंका गांधी यांना ताब्यात घेतले पण नंतर त्यांना सोडून दिले.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0