‘रेड राज’ सुरूच – काँग्रेसने  

‘रेड राज’ सुरूच – काँग्रेसने  

कॉँग्रेस पक्षाने म्हटले आहे, की नरेंद्र मोदी सरकारला फक्त धमक्या कशा द्यायच्या आणि इतरांना कसे धमकावायचे हे माहित आहे, परंतु अखेर लोकशाहीचा विजय होईल.

‘हेट स्पिच’ला सत्ताधाऱ्यांकडूनच पाठबळः न्या. नरिमन
‘स्वतःमध्ये बदल करण्याची काँग्रेसची इच्छा नाही’
उद्धव वाकले पण मोडले नाहीत…

कॉँग्रेस पक्षाने म्हटले आहे, की नरेंद्र मोदी सरकारला फक्त धमक्या कशा द्यायच्या आणि इतरांना कसे धमकावायचे हे माहित आहे, परंतु अखेर लोकशाहीचा विजय होईल.

मानवी हक्क अधिकार कार्यकर्ते हर्ष मंदेर आणि अभिनेता सोनू सूद यांच्या घरांवर आणि कार्यालयांवर तपास यंत्रणांनी छापेमरी केल्यानंतर काँग्रेसने गुरुवारी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. कॉँग्रेसने म्हटले, की धमक्या कशा द्यायच्या आणि इतरांना कसे धमकावायचे हे सरकारला माहित आहे. परंतु लोकशाही अजूनही जिंकेल.

काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले, की नरेंद्र मोदी सरकारच्या काळात ‘छापे राज’ सुरू असले तरी उत्तरदायित्वाची मागणी केली जाईल.

“रेड राज अविरत चालू आहे! धमकी कशी द्यायची सरकारला माहीत आहे! धमक्या हा मोदी सरकारचा मंत्र आहे! हर्ष मंदेर आणि सोनू सूद हे नवीन लक्ष्य आहेत, ” असे त्यांनी ट्विटरवर म्हंटले आहे. ते म्हणाले, “सत्याचा विजय होईल, आमची असहमती आणि विरोध आहेच. जबाबदारी निश्चित केली जाईल. प्रश्न विचारले जातील, लोकशाहीचा विजय होईल.”

अधिकृत सूत्रांनी सांगितले आहे, की अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंगच्या तपासासंदर्भात गुरुवारी मानवाधिकार कार्यकर्ते आणि निवृत्त आयएएस अधिकारी हर्ष मंदेर यांच्या घरावर आणि कार्यालयांवर छापे टाकले.

आयकर विभागाच्या आधींकाऱ्यांनी बुधवारी आणि गुरुवारी मुंबईत अभिनेता सोनू सूद याच्या घरी आणि इतर काही ठिकाणी कथित करचोरीच्या चौकशीच्या संदर्भात दिवसभर शोध घेऊन सर्वेक्षण केले.

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनीही म्हटले आहे, की मोदी सरकारच्या नेतृत्त्वाखाली भीती, लबाडी आणि धमकावणे सुरूच आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: