रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात तळई या गावामध्ये दरड कोसळून त्याखाली घरे दबली गेली आहेत. या घटनेत आतापर्यंत ३२ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून,
रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात तळई या गावामध्ये दरड कोसळून त्याखाली घरे दबली गेली आहेत. या घटनेत आतापर्यंत ३२ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, अजून ४० जण बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. तसेच साखर सुतार वाडी येथेही दरड कोसळून चार जणांचा मृत्यू झाला आहे.
तळई येथे सकाळी मदत व बचाव कार्य सुरू करण्यात आले. त्यावेळी ढिगारा उपासण्याचे काम सुरू झाले. त्यात अनेकजणांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले.
गुरुवारी संध्याकाळी ४ च्या सुमारास तळईमध्ये ही घटना घडली. या घटनेमध्ये ८० जण दबले गेले असल्याची माहिती तळई गावातील नागरिकांनी दिली. ‘एनडीआरएफ’ आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.
रत्नागिरीच्या खेड तालुक्यामध्ये पोसरे बौद्धवाडी येथे दरड कोसळून १७ जण अडकल्याची माहिती आली आहे. तर बीरमणी येथे दोन जण अडकल्याचे वृत्त आहे. शुक्रवारी सकाळी ही माहिती समोर आली. या ठिकाणी एनडीआरफच्या दोन टीम पोहोचल्या असून, मदतकार्य सुरु करण्यात आले आहे. बीरमणी येथे नुकताच रस्ता खचला होता.
अतिवृष्टीमुळे कोकणातील सर्व भागामध्ये पुर आले असून, गावांचा संपर्क तुटला आहे. महाडमध्ये पूरग्रस्तांच्या बचावकार्याला सुरवात झाली आहे. काही ठिकाणी हेलिकॉप्टरच्या सहाय्याने बचवकार्य करण्यात येत आहे.
बचावकार्य आणि मदतीचा आढावा घेणीचे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करीत आहेत. मध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “चार पाच दिवसांपासून मी आढावा घेत आहे. आपल्याला काही शब्दांची व्याख्या बदलावी लागणार आहे. अतिवृष्टीच्या पलीकडे जाऊन पाऊस होत आहेत. जीवितहानी होऊ नये हा प्रयत्न असणार आहे. पुरात अडकलेल्यांना वाचवण्यावर व नदी परिसरातील नागरिकांच्या स्थलांतरावर भर देण्यात येत आहेत.” डोंगर उतारावरील लोकांनी स्थलांतर करावे असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
पुरात अडकलेल्या लोकांनी घराच्या छतावर किंवा उंचावर गेल्यास हेलिकॉप्टरमधील बचाव पथकाला ते दिसतील यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन प्रशासनाने केले आहे. एमआयडीसीचे अग्निशामक दलदेखील मदत कार्यात उतरले असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली.
महाड तालुक्यातील डोंगराळ भागात काही ठिकाणी पूल आणि रस्ते वाहून गेले असून बचाव पथकांच्या सहाय्याने नागरिकांना संपर्क करून सुरक्षित स्थळी हलवावे. रस्त्यावरील अडथळे काढणे लगेच सुरू करावे. या परिस्थितीत कोविड तसेच इतर रुग्णांना त्रास होऊ नये याची खबरदारी घेण्यास मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
COMMENTS