काश्मीरमधील नेते, पत्रकार, कार्यकर्त्यांवरही पाळत

काश्मीरमधील नेते, पत्रकार, कार्यकर्त्यांवरही पाळत

श्रीनगरः द वायरने तपासणी केलेल्या डेटाबेसनुसार इस्रायलची कंपनी एनएसओ समुहाने एका अज्ञात सरकारी संस्थेच्या मदतीने दिल्लीत राहणारे काश्मीरी पत्रकार व जम

सर्व प्रश्नांचे मूळ जेव्हा गांधी घराणे असते तेव्हा..
सर्वोच्च न्यायालयाकडून आता आशा उरलेली नाहीः सिब्बल
विद्युत वाहनांमुळे प्रदूषणात आणखी वाढ?

श्रीनगरः द वायरने तपासणी केलेल्या डेटाबेसनुसार इस्रायलची कंपनी एनएसओ समुहाने एका अज्ञात सरकारी संस्थेच्या मदतीने दिल्लीत राहणारे काश्मीरी पत्रकार व जम्मू आणि काश्मीरसंबंधित मोदी सरकारच्या धोरणावर टीका करणार्या सामाजिक कार्यकर्त्यांचे मोबाइल क्रमांक पाळत ठेवण्यासाठी निश्चित केले होते. या व्यतिरिक्त काश्मीर खोर्यातील अन्य २५ जणांचे मोबाइल क्रमांकही २०१७ ते २०१९ या काळात पाळत ठेवण्यासाठी निश्चित केले होते, अशी माहिती उघडकीस आली आहे.

फ्रान्समधील ना नफा तत्वावर काम करणार्या फॉरबिडेन स्टोरीज या वृत्तसंस्थेने व अमनेस्टी इंटरनॅशनल या संस्थेने जगभरातील ५० हजार मोबाइल क्रमांक पिगॅसस स्पायवेअरने पाळत ठेवण्यासाठी निश्चित केल्याचा डेटाबेस उघडकीस आणला होता. यातील ३७ फोनमध्ये पिगॅसस स्पायवेअर असल्याचे फॉरेन्सिक चाचणीतून निष्पन्न झाले आहे.

काश्मीरमधील ज्या मोबाइल क्रमांकाची फोरेन्सिक चाचणी करण्यात आली, त्यातील एक क्रमांक फुटीरतावादी नेता बिलाल लोन व दुसरा क्रमांक दिल्ली विद्यापीठातील दिवंगत प्राध्यापक एसएआर गिलानी यांचा आढळून आला आहे. गिलानी यांचे २०१८मध्ये निधन झाले होते.

बिलाल लोन यांच्या मोबाइल फोनमध्ये २०१९मध्ये स्पायवेअरच्या घुसखोरीचे पुरावे मिळाले.

ऑगस्ट २०१९मध्ये जम्मू व काश्मीरला विशेष दर्जा देणारे राज्य घटनेतील ३७० कलम संसदेने रद्द केले होते, या निर्णयावर काश्मीर खोर्यातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. अनेक राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, मानवाधिकार कार्यकर्ते या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरले होते. अनेकांना तुरुंगातही टाकण्यात आले होते. या काळात बिलाल लोन यांचे बंधु सज्जाद लोन यांनी पीपल्स इंडिपेंडंट मुव्हमेंट हा नवा राजकीय पक्ष स्थापन केला होता.

द वायरने बिलाल लोन यांच्याशी संपर्क केला असता लोन यांनी आपण आता राजकारणापासून दूर असल्याचे सांगितले. मी श्रीनगरमधील बेकरीवर लक्ष केंद्रीत केले आहे. फोन टॅपिंगच्या अफवा यापूर्वी अनेकवेळा ऐकल्या आहेत. पण आपला फोन टॅप होईल असे या पूर्वी कधी वाटलेही नाही. मी अत्यंत छोटा व्यक्ती आहे, असे ते म्हणाले.

एसएआर गिलानी यांच्या फोनची फॉरेन्सिक चाचणी केली असता फेब्रुवारी २०१८ ते जानेवारी २०१९ या दरम्यान त्यांच्या मोबाइल हँटसेटमध्ये पिगॅसस स्पायवेअरची घुसखोरी झाल्याचे दिसून आले. त्यांच्या फोनमध्ये स्पायवेअर घालण्यासाठी झिरो क्लिक मेसेज तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता, असे दिसून आले.

काश्मीरमधील मोबाइल क्रमांकाचे पाळत ठेवण्यासाठी झालेली निवड व प्रत्यक्ष मोबाइलमध्ये स्पायवेअरची घुसखोरी या संदर्भात द वायर व अन्य सहकारी वृत्तसंस्थांनी पहिलेच स्पष्टीकरण दिले आहे. एखादा फोन हेरगिरीसाठी निश्चित करणे व एखाद्या फोनमध्ये स्पायवेअर घालणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पण हेरगिरीसाठी विशिष्ट व्यक्तींच्या क्रमांकाची निवड करणे व ती का केली गेली हा महत्त्वाचा मुद्दा आहे.

जो डेटाबेस उघडकीस आला आहे त्यात पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीचे प्रमुख व जम्मू व काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या कुटुंबातील दोन सदस्यांचे क्रमांक आहेत.

२०१८मध्ये पीडीपी व भाजपमधील युती संपुष्टात आल्यानंतर हे फोन क्रमांक पाळतीसाठी निश्चित करण्यात आले हे महत्त्वाचे आहे. या संदर्भात मुफ्ती यांच्याशी या योगायोगाबाबत विचारणा केली असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. काश्मीरमध्ये फोन टॅप करणे वगैरे बाब काही नवी नाही. येथील जनतेला स्वतःचे मत मांडले तरी शिक्षा भोगावी लागते हे मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या.

भाजपच्या निकटच्या नेत्याचे नाव

पिगॅससच्या डेटाबेसमध्ये जम्मू-काश्मीर अपनी पार्टीचे अध्यक्ष अल्ताफ बुखारी यांचे बंधु तारिक बुखारी यांचे नाव आढळून आले आहे. अल्ताफ बुखारी हे पीडीपी-भाजप सरकारमध्ये मंत्री होते. पण २०१९मध्ये त्यांना पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे निलंबित करण्यात आले. त्यानंतर २०२०मध्ये त्यांनी स्वतःचा पक्ष काढला ज्याला केंद्रातून पाठिंबा असल्याचे बोलले जाते.

अल्ताफ बुखारी यांचे बंधु तारिक यांचेही नाव सर्विलान्ससाठी निश्चित होते. तारिक हे व्यापारी असून २०१९मध्ये दहशतवाद्यांना आर्थिक निधी देत असल्याच्या संशयावरून त्यांची चौकशी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून सुरू झाली होती. तारिक बुखारी काश्मीरचा दर्जा काढून टाकण्याच्या केंद्राच्या निर्णयाचे समर्थन करणारे होते.

पाळत ठेवण्याच्या निश्चित क्रमांकात काश्मीरमधील फुटीरतावादी नेते सय्यद अली शाह गिलानी यांचे जावई व पत्रकार इफ्तिखार गिलानी, त्यांचा वैज्ञानिक मुलगा सैयद नसीम गिलानी सहित कुटुंबातील कमीत कमी ४ सदस्यांचा समावेश होता. २०१७ ते २०१९ या काळात हे क्रमांक निवडण्यात आले होते.

याच बरोबर हुर्रियत कॉन्फरन्सचे प्रमुख मीरवाइज उमर फारुक यांचाही मोबाइल क्रमांक एनएसओच्या रडारवर होता. शिवाय फारुक यांचा ड्रायव्हरही निशाण्यावर होता.

पत्रकार व कार्यकर्तेही रडारवर

पिगॅससच्या डेटाबेसमध्ये काश्मीर खोर्यातील मानवी हक्कांसाठी लढणारे वकार भट्टी यांचा मोबाइल क्रमांक होता. त्याच बरोबर इंडियन एक्स्प्रेसचे मुजमिल जलील, हिंदुस्तान टाइम्सचे माजी पत्रकार औरंगजेब नक्शबंदी, डीएनएतील माजी पत्रकार इफ्तिखार गिलानी व पीटीआयचे सुमीर कौल यांचेही क्रमांक पाळत ठेवण्यासाठी निश्चित करण्यात आले होते. अन्य एका पत्रकाराचे नाव त्यांनी जाहीर करू नये अशी विनंती केल्याने ते प्रसिद्ध केलेले नाही.

दिल्लीत राहणारे केंद्राच्या काश्मीर धोरणाचे राजकीय टीकाकार शब्बीर हुसेन यांचे नावही डेटाबेसमध्ये आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: