विश्वकोश मंडळाच्या अध्यक्षपदी राजा दीक्षित

विश्वकोश मंडळाच्या अध्यक्षपदी राजा दीक्षित

मुंबईः महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळावर डॉ. श्रीधर तथा राजा दीक्षित यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली असून व ३० सदस्यांची पुढ़ील तीन वर्षाच्या कालावधीसाठी किंवा शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व नियुक्त सदस्यांचे मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांनी अभिनंदन केले आहे.

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळावर विविध क्षेत्राशी निगडीत अध्यक्ष ३० सदस्य अशा एकूण ३१ सदस्यांची ५ मे २०१९ च्या शासन निर्णयान्वये तीन वर्षाच्या कालावधीसाठी किंवा शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत नियुक्ती करण्यात आली होती. या मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबेळकर यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर मंडळाची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या समितीत  पुढील प्रमाणे सदस्यांची नियुक्ती झाली आहे.

डॉ. श्रीधर तथा राजा दीक्षित-अध्यक्ष, डॉ. भीमराव उल्मेक, डॉ. श्रीनंद बापट, डॉ.अरुण भोसले, राहुल देशमुख, डॉ. प्रभाकर देव, सतीश आळेकर, हेमंत राजोपाध्ये, सुबोध जावडेकर, आसाराम लोमटे, डॉ. रविंद्र रुक्मिणी रविंद्रनाथ, निखिलेश चित्रे, डॉ. प्रकाश पवार, शर्मिला फडके, डॉ. प्राची देशपांडे, प्राची दुबळे, डॉ. सदाशिव पाटील, प्रा. संजय ठिगळे, डॉ. कृष्णदेव गिरी, डॉ. विशाल इंगोले, डॉ. निंबा देवराव नांद्रे, प्रा. संतोष पवार, मनिषा उगले, भाऊसाहेब चासकर, उल्हास पाटील.

COMMENTS