अविवाहित-विवाहित स्त्री-पुरुष लिव्ह इन अवैध

अविवाहित-विवाहित स्त्री-पुरुष लिव्ह इन अवैध

जयपूरः अविवाहित पुरुष व विवाहित महिला ‘लिव्ह इन रिलेशनशीप’मध्ये राहू शकत नाहीत, हे संबंध अवैध असल्याचा निर्णय राजस्थान उच्च न्यायालयाने नुकताच दिला.

शाह फैसल पुन्हा प्रशासकीय सेवेत रूजू
जम्मू-काश्मीर राज्यपालांच्या सूर्य मंदिरातील पूजेवर पुरातत्व खाते नाराज
भूस्खलनग्रस्त मीरगाव, आंबेघर, हुम्बराळेचे तात्पुरते पुनर्वसन

जयपूरः अविवाहित पुरुष व विवाहित महिला ‘लिव्ह इन रिलेशनशीप’मध्ये राहू शकत नाहीत, हे संबंध अवैध असल्याचा निर्णय राजस्थान उच्च न्यायालयाने नुकताच दिला.

राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यातील ३० वर्षांची एक विवाहित महिला व २७ वर्षांच्या एका अविवाहित पुरुषाने राजस्थान उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करत त्यांच्या लिव्ह इन रिलेशनला संमती द्यावी अशी मागणी केली होती. या दोघांनी आपल्या जीवाला नातेवाईकांकडून धोका असल्याचीही तक्रार केली होती. आम्ही दोघे कायद्याने सज्ञान आहोत. महिला विवाहित असली तरी तिचा पती तिला सतत मारहाण करतो. ती त्याच्यासोबत राहू शकत नाहीत, असे या दोघांच्या याचिकेत नमूद करण्यात आले होते.

या याचिकेला आक्षेप घेत महिलेच्या पतीने आपल्या पत्नीचे अविवाहित पुरुषाशी असलेले संबंध अवैध, सामाजिक संकेतांना धरून नसल्याचे व कायद्याच्या विरोधात असल्याचा युक्तिवाद करत दोघांना पोलिस संरक्षण देऊ नये, असा मुद्दा मांडला होता.

त्यावर न्या. शर्मा यांनी याचिकाकर्त्या महिलेचे लग्न झाले असून त्यांचा घटस्फोटही झालेला नाही. तरीही त्या अन्य अविवाहित पुरुषाशी लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहात आहेत. हे संबंध कायद्याच्या दृष्टीकोनातून अनैतिक होतात, असे स्पष्ट केले.

न्यायालयाने या दोघांनी मागितलेल्या पोलिस संरक्षणाची मागणीही रद्द केली. पोलिसांचे संरक्षण दिल्यास या दोघांच्या अनैतिक संबंधांना मान्यता दिल्यासारखे होईल, असे न्यायालयाने सांगितले.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0