राम मंदिराच्या निधीसाठी उ. प्रदेश सरकारचे बँक खाते

राम मंदिराच्या निधीसाठी उ. प्रदेश सरकारचे बँक खाते

लखनौः भारताची राज्यघटना सर्व धर्मांना स्वातंत्र्य देते त्याचबरोबर प्रत्येक नागरिकाला त्याच्या धर्मप्रचाराचे, अभ्यासाचे व प्रसाराचे स्वातंत्र्य देते. प

लखनौतील फलक हटवावेत : अलाहाबाद हायकोर्ट
अयोध्या: सरकार व न्यायसंस्थेला जमले नाही ते भारतातील मुस्लिमांनी करून दाखवले
‘डॉ. काफील खान यांची सुटका व्हावी की नाही’

लखनौः भारताची राज्यघटना सर्व धर्मांना स्वातंत्र्य देते त्याचबरोबर प्रत्येक नागरिकाला त्याच्या धर्मप्रचाराचे, अभ्यासाचे व प्रसाराचे स्वातंत्र्य देते. पण भारताची राज्यघटना धर्माच्या नावावर पैसा गोळा करण्याचे अधिकार सरकारला देत नाही.

मात्र उत्तर प्रदेश सरकार ज्याला आज काल अल्ट्रा प्रदेश असेही संबोधले जाते त्यांनीने राज्यघटनेलाच धाब्यावर बसवण्याचे ठरवलेले दिसत आहे. उ. प्रदेश सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्लूडी) अयोध्या राम मंदिराच्या निर्मितीसाठी निधी गोळा करण्यासाठी एक बँक खातेच उघडलेले आहे.

१९ जानेवारी रोजी पीडब्लूडीचे मुख्य अभियंता (विकास) राजपाल सिंह यांनी लखनौतील एमजी रोडवरील एचडीएफसी बँकेच्या शाखेच्या प्रमुखांकडे पीडब्लूडी राम मंदिर वेलफेअर या नावाचे खाते उघडण्याची विनंती केली असता, बँक शाखाप्रमुखांनी तत्परतेने राजपाल सिंह यांची विनंती स्वीकारली व बँक खाते उघडले. या खात्याचा क्रमांक 50100365009830 असा आहे.

वास्तविक राज्य घटनेतील कलम २७ हे सरकारला कोणत्याही धर्माचा प्रसारासाठी निधी गोळा करण्यास मनाई करते किंवा धर्माच्या नावावर सरकारी पैसा खर्च करण्यास मनाई करते. त्याचबरोबर कोणाही नागरिकावर धार्मिक कार्यक्रमासाठी पैसा गोळा करण्यापासून सरकारला रोखते.

उ. प्रदेश पीडब्लूडी खात्यातील कर्मचारी स्वेच्छेने दान करू शकतात पण सरकारी यंत्रणा धर्माच्या प्रचारासाठी किंवा धर्मस्थळे बांधण्यासाठी असे खाते खोलून आपल्या कर्मचार्यांकडून निधी गोळा करू शकत नाही. ही जबरदस्तीची वसुली म्हटली जाते.

  • हे खाते सुरू करावे हा मुख्य अभियंतांचा निर्णय आहे की नाही हे स्पष्ट झालेले नाही पण असे खाते सुरू करावे याचा अलिखित आदेश वरिष्ठांकडून आल्याशिवाय असा प्रकार घडणे शक्य नाही. या संदर्भात द वायरने मुख्य अभियंत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

उ. प्रदेश सार्वजनिक बांधकाम खात्याचे भार उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्याकडे असून मौर्य हे पूर्वाश्रमीचे विश्व हिंदू परिषदेशी निगडीत कार्यकर्ते होते. बाबरी मशीद पाडणार्या विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष अशोक सिंघल हे मौर्य यांचे गुरू होते.

मौर्य यांचा राम मंदिर आंदोलनातील सहभाग व त्यांचे सिंघल यांच्याशी संबंध पाहता भाजपमध्ये अनेक बडी पदे त्यांनी भूषवली होती. २०१७मध्ये ते भाजपचे उ. प्रदेश अध्यक्ष होते. एक ओबीसी नेता असल्याने ते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत प्रबळ दावेदार होते. पण योगी आदित्य नाथ यांनी मुख्यमंत्रीपद पटकावल्याने मौर्य यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले.

राम मंदिराच्या निर्माणासाठी उ. प्रदेशातून पैसा गोळा करण्याचे काम मौर्य यांच्याकडून सुरू आहे. योगी आदित्य नाथ यांच्यापेक्षा आपण अधिक पैसा गोळा करू असा त्यांचा सततचा प्रयत्न आहे. दुसरीकडे उ. प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्य नाथ हे गोरखपूर मंदिराचे प्रमुख आहे. या मंदिराकडे मोठ्या प्रमाणावर पैसा आहे. या मंदिरातील काही रक्कम राम मंदिर निर्मितीसाठी देण्यात येणार आहे.

मूळ बातमी

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: