सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आग, ५ जणांचा मृत्यू

सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आग, ५ जणांचा मृत्यू

पुण्यातील मांजरीस्थित सीरम इन्स्टिट्यूटमध्ये गुरुवारी लागलेल्या आगीत ५ जणांचा भाजून मृत्यू झाला. या संस्थेत सध्या कोविड-१९वरच्या कोविशिल्ड लसीचे उत्पा

कोविड लसींबाबत डीसीजीआयकडून उत्तरे अपेक्षित
राज्यात एकाच दिवशी ५ लाख लोकांना लस
राज्यात सर्वांना ३० नोव्हें.पर्यंत पहिली लस

पुण्यातील मांजरीस्थित सीरम इन्स्टिट्यूटमध्ये गुरुवारी लागलेल्या आगीत ५ जणांचा भाजून मृत्यू झाला. या संस्थेत सध्या कोविड-१९वरच्या कोविशिल्ड लसीचे उत्पादन सुरू आहे. पण आग लागलेला भाग अपूर्ण बांधकामाचा होता व ही इमारत प्रत्यक्ष लस उत्पादन प्रकल्पापासून १ किमी लांब अंतरावर आहे. त्यामुळे या आगीत लस उत्पादनावर परिणाम होणार नाही, असे सीरमचे सीईओ अदार पुनावाला यांनी सांगितले. झालेली घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचेही ते म्हणाले.

आग लागल्यानंतर काही काळाने पुनावाला यांनी एक ट्विट करून आगीत अडकलेल्या सर्वांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आलं आहे. आगीत कुणीही जखमी झालेलं नाही व कोणतीही जीवितहानी झालेली नाही. काही मजल्यांचे मात्र नुकसान झाले आहे, असे नमूद केले होते. पण नंतर त्यांनी ५ कर्मचार्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे ट्विट केले.

ही आग गुरुवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास लागली. सीरम इन्स्टिट्यूटच्या परिसरातील एसईझेड-३ इमारतीतील चौथ्या व पाचव्या मजल्याला आग लागली. आगीचे वृत्त पसरल्यानंतर अग्निशमन दलाच्या बंबांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन ही आग २ तासात नियंत्रणात आण. या इमारतीतून ९ जणांना सुखरूप वाचवल्याचे पोलिस उपायुक्त नम्रता पाटील यांनी पीटीआयला सांगितले. तर अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी प्रशांत रणपीसे यांनी इमारतीला लागलेली आग सुमारे १५ बंबांनी विझवल्याचे सांगितले. आग कोणत्या कारणामुळे लागली याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. या इमारतीत कोणतेही यंत्र वा सामग्री नव्हती, असे रणपीसे यांनी सांगितले.

सीरमला आग लागल्याची वार्ता वार्यासारखी पसरली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या आगीची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संस्थेला लागलेली आग शॉर्ट सर्किटमुळे होती, अशी माहिती मिळाल्याचे सांगितले.  

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0