आरोपी नित्यानंदने स्थापन केले ‘कैलास’ राष्ट्र

आरोपी नित्यानंदने स्थापन केले ‘कैलास’ राष्ट्र

नवी दिल्ली : बलात्काराच्या आरोपामुळे काही दिवसांपूर्वी देशातून पसार झालेल्या स्वामी नित्यानंद याने द. अमेरिकेतील इक्वेडोर देशानजीकच्या एका बेटावर जाऊन

‘लिव्ह इन रिलेशनशीप कायदेशीरच’
सामाजिक एकजूटीचे सनदी सेवेतील मुस्लिम अधिकाऱ्यांचे आवाहन
अग्निपथ योजना रद्द केली जाणार नाहीः लष्कर

नवी दिल्ली : बलात्काराच्या आरोपामुळे काही दिवसांपूर्वी देशातून पसार झालेल्या स्वामी नित्यानंद याने द. अमेरिकेतील इक्वेडोर देशानजीकच्या एका बेटावर जाऊन स्वतंत्र देशाची घोषणा केल्याचे वृत्त ‘न्यूज-18ने दिले आहे. नित्यानंदने आपल्या देशाचे नाव ‘कैलास’ असे ठेवले असून त्याने स्वत:ची एक वेबसाइटही प्रसिद्ध केली आहे. या वेबसाइटवर ‘कैलास’ हे पृथ्वीतलावरचे सर्वश्रेष्ठ हिंदू राष्ट्र असल्याचा दावा करण्यात आला आहे. या देशात जगभरात पसरलेल्या हिंदूंनी या नव्या राष्ट्रात राहायला यावे, तेथील नागरिकत्व घ्यावे असेही आवाहन नित्यानंदने केले आहे.

तामिळनाडू येथील रहिवासी असलेल्या स्वामी नित्यानंद याचे मूळ नाव राजशेखरन असून त्याच्यावर बलात्काराचा आरोप आहे. त्या आरोपाखाली त्याला अटक करण्याअगोदर त्याने देशाबाहेर पलायन केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याच्या पासपोर्टची मुदतही सप्टेंबर २०१८मध्ये संपलेली होती तरीही तो देशाबाहेर पळून गेल्याने त्याच्या नोकरशाहीशी असलेल्या हितसंबंधांवरून अनेक तर्कवितर्क लढवले जात होते.

सीमा नसलेला देश

नित्यानंदने आपल्या ‘कैलास’ या वेबसाइटवर स्वतंत्र हिंदू राष्ट्राचा गौरव करताना या देशाला सीमा नसतील असे जाहीर केले. ज्या हिंदूंना धर्माचरण करताना अडचणी येतात, ज्यांचे हक्क डावलले जातात अशांना या राष्ट्रात स्थान देण्यात येईल. या राष्ट्रात मंदिरावर आधारित समाजरचना असेल, तेथे योग, ध्यानधारणा व गुरुकुल शिक्षण पद्धती असेल. आरोग्य, शिक्षण व अन्न मोफत असेल अशीही घोषणा त्याने केली आहे.

‘कैलास’चा पासपोर्ट मिळण्याची सोय

नित्यानंदने आपल्या स्वतंत्र ‘कैलास’ देशाचा पासपोर्टही गरजूंना मिळेल असे स्पष्ट केले आहे. हा पासपोर्ट मिळाल्यास संबंधित व्यक्तीला ‘कैलास’सह ११ मिती व १४ लोकांमध्ये मोफत प्रवेश मिळेल असेही जाहीर केले आहे. नित्यानंदने स्वत:च्या देशासाठी एक रिझर्व्ह बँक व हिंदू गुंतवणूक अशी धार्मिक अर्थव्यवस्था असेल असेही जाहीर केले आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0