रिझर्व्ह बँकेचे डेप्यु. गव्हर्नर विरल आचार्य यांचा राजीनामा

रिझर्व्ह बँकेचे डेप्यु. गव्हर्नर विरल आचार्य यांचा राजीनामा

रिझर्व्ह बँकेचे डेप्यु. गव्हर्नर विरल आचार्य यांनी निवृत्तीआधी सहा महिने अगोदर सोमवारी अचानक राजीनामा दिला.

माहिती-आकडेवारी जाहीर करा – २०० अर्थतज्ज्ञांची मागणी
‘भूषण यांनी माफी मागावी किंवा स्पष्टीकरण द्यावे’
‘नवा’च्या नमुन्यामागे दडवलेले सत्य

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेचे डेप्यु. गव्हर्नर विरल आचार्य यांनी निवृत्तीआधी सहा महिने अगोदर सोमवारी अचानक राजीनामा दिला. आचार्य यांनी त्यांचा राजीनामा काही व्यक्तिगत कारणामुळे दिल्याचे रिझर्व्ह बँकेकडून सांगण्यात आले. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी सरकारशी मतभेद असल्याच्या कारणावरून राजीनामा दिला होता. त्यानंतरचा हा रिझर्व्ह बँकेतील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पदावरच्या दुसऱ्या व्यक्तीचा हा राजीनामा आहे. आपल्याला मुदतवाढ मिळणार नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे. आचार्य हे न्यू यॉर्क विद्यापीठात अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून पुन्हा रुजू होणार असल्याचे समजते.

२०१६ साली सप्टेंबर महिन्यात उर्जित पटेल यांनी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर २३ जानेवारी २०१७ रोजी विरल आचार्य यांनी डेप्यु. गव्हर्नर पदाची तीन वर्षांसाठी सूत्रे हाती घेतली होती. रिझर्व्ह बँकेचे ते सर्वात तरुण डेप्यु. गव्हर्नर होते. ते स्वतंत्र आर्थिक विचारांचे होते व वाढत्या कर्जाच्या जोखमीमुळे अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम या विषयात ते जाणकार होते.

गेल्या ४ एप्रिलला जाहीर झालेल्या रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणावरून त्यांचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्याशी मतभेद झाले होते. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास हे रेपो रेटमध्ये बदल केल्याने अर्थव्यवस्थेला गती मिळेल या मताचे होते. तर आचार्य अन्न व इंधनातील वाढती महागाई लक्षात घेऊन रिझर्व्ह बँकेच्या रेपो रेटच्या बदलाबाबत समाधानी नव्हते. पण रिझर्व्ह बँकेच्या सहा सदस्यांच्या समितीने ४-२ अशा बहुमताने रेपो रेट ६ टक्क्याहून २५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला होता.

गेल्या वर्षी रिझर्व्ह बँकेच्या स्वायत्ततेवरून उर्जित पटेल व सरकारदरम्यान निर्माण झालेल्या संघर्षात आचार्य यांनी पटेल यांची बाजू घेतली होती व देशाचे आर्थिक धोरण निश्चित करण्यासाठी रिझर्व्ह बँकेची स्वायत्तता अबाधित राखणे हे अत्यंत महत्त्वाचे असल्याची भूमिका त्यांनी घेतली होती.

आचार्य यांनी १९९५मध्ये आयआयटी मुंबई येथून कम्प्युटर सायन्स व इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक पदवी घेतली होती. नंतर २००१मध्ये त्यांनी न्यू यॉर्क विद्यापीठातून पीएचडी मिळवली. २००१ ते २००८ या काळात ते लंडन बिझनेस स्कूल, २००७-०९ लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये ते अध्यापन करत होते. २००८मध्ये ते बँक ऑफ इंग्लंडमध्ये संशोधक म्हणून रुजू झाले होते.

आचार्य यांनी रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्यासोबत काही संशोधनपर निबंध लिहिले आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: