पाकिस्तानचे हल्ले म्हणून दाखवले व्हिडिओ गेमचे फूटेज

पाकिस्तानचे हल्ले म्हणून दाखवले व्हिडिओ गेमचे फूटेज

नवी दिल्लीः पाकिस्तानचे हवाईदल अफगाणिस्तानातील पंजशीर खोऱ्यात हल्ले करत आहे असे दाखवणारा एक व्हिडिओ, तालीबानने पंजशीर खोऱ्यावर विजय मिळवल्याचा दावा के

‘१९८४’ची पुनरावृत्ती होऊ देणार नाही – दिल्ली हायकोर्ट
कर्नाटकात मुस्लिम विद्यार्थ्यांची संख्यामोजणी सुरू
धुळ्याचे पक्षी नंदनवन – नकाणे तलाव

नवी दिल्लीः पाकिस्तानचे हवाईदल अफगाणिस्तानातील पंजशीर खोऱ्यात हल्ले करत आहे असे दाखवणारा एक व्हिडिओ, तालीबानने पंजशीर खोऱ्यावर विजय मिळवल्याचा दावा केल्यानंतर, ‘रिपब्लिकन टीव्ही’ने ‘एक्स्लुजिव’ म्हणून प्रक्षेपित केला. प्रत्यक्षात ते एका व्हिडिओ गेममधील फूटेज असल्याचे लक्षात आले. तालीबानला पाकिस्तान अधिकृतरित्या मदत करत आहे, पाकिस्तानचा इस्लामी मूलतत्त्ववाद्यांना उघड पाठिंबा आहे, असा दावा करणारा हा व्हिडिओ ‘रिपब्लिकन टीव्ही’पाठोपाठ बऱ्याच भारतीय वृत्तवाहिन्यांनी कोणतीही शहानिशा न करता प्रक्षेपित केला.

हाच व्हिडिओ ‘टाइम्स नाऊ नवभारत’ आणि ‘झी हिंदुस्तान’ या वाहिन्यांनी वापरला.

‘टाइम्स नाऊ नवभारत’ वाहिनीने नंतर ते फूटेज काढून टाकले.

‘टीव्ही नाइन भारतवर्ष’नेही याच प्रकारचे दुसरे फूटेज प्रक्षेपित केले आणि पंजशीर संघर्षात पाकिस्तानचा थेट सहभाग असल्याचा ‘पुरावा’ मिळाल्याचा दावाही त्याबरोबर केला. हा व्हिडिओ ‘हस्ती टीव्ही’ने शेअर केल्याचे फरान जाफरी या, स्वत:ची ओळख काउंटर-टेररिझम एक्स्पर्ट अशी सांगणाऱ्या, व्यक्तीने ट्विटद्वारे शेअर केले. पाकिस्तानी हवाईदल पंजशीरमधील बंडखोरांवर कसे हल्ले करत आहे बघा, अशी पोस्ट विडंबनात्मक शैलीत त्यांनी प्रथम केली. नंतर हे फूटेज एका व्हिडिओ गेममधील आहे, असे त्यांनीच स्पष्ट केले.

जाफरी पंजशीरमधील ‘पाकिस्तानी हल्ल्यां’बद्दल पसरवल्या जाणाऱ्या चुकीच्या माहितीबद्दल सर्वांना सावध करत होते. त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आणि त्यानंतर लगेचच ‘फन फॅक्ट्स’ पोस्ट केल्या. मात्र, त्यांनी केलेल्या पहिल्या ट्विटला बऱ्याच वाहिन्या फशी पडल्या.

‘रिपब्लिक टीव्ही’ने प्रक्षेपित केलेले फूटेज हे ‘आर्मा थ्री’ या व्हिडिओ गेममधील होते. ‘रिपब्लिक टीव्ही’च्या सोशल मीडिया चॅनल्सवरून नंतर हे फूटेज काढून घेण्यात आले.

‘टीव्हीनाइन भारतवर्ष’ने प्रक्षेपित केलेले फूटेज याच वाहिनीने गेल्या वर्षी आर्मेनियाने पाडलेल्या मिग ट्वेंटीफाइव्हची दृश्ये म्हणून दाखवले होते. ही क्लिपही ‘आर्मा थ्री’ व्हिडिओ गेममधीलच आहे.

तालीबानने अफगाणिस्तानातील सत्ता ताब्यात घेतल्यापासून भारतातील मुख्य प्रवाहातील माध्यमांमध्ये चुकीच्या बातम्यांचा पूर आला आहे. ‘ऑल्ट न्यूज’ यातील अनेक चुकीच्या बातम्यांमागील सत्य उघड करत आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0