वर्षंभरात २ हजार रु.च्या एकाही नोटेची छपाई नाही

वर्षंभरात २ हजार रु.च्या एकाही नोटेची छपाई नाही

मुंबईः आर्थिक वर्ष २०१९-२०मध्ये रिझर्व्ह बँकेने २ हजार रु.ची एकही नोट छापलेली नाही. त्यामुळे सध्या बाजारात २ हजार रु.ची टंचाई का आहे, याचा खुलासाच रिझ

परकीय चलनात २ वर्षांतील सर्वात मोठी घट
केवळ जानेवारीत १,२१३ कोटी रु. इलेक्शन बाँडची विक्री
बनावट चलनाचे भूत पाकिस्तानातून पुन्हा अवतीर्ण?

मुंबईः आर्थिक वर्ष २०१९-२०मध्ये रिझर्व्ह बँकेने २ हजार रु.ची एकही नोट छापलेली नाही. त्यामुळे सध्या बाजारात २ हजार रु.ची टंचाई का आहे, याचा खुलासाच रिझर्व्ह बँकेच्या २०१९-२०च्या वार्षिक अहवालात प्रसिद्ध झाला आहे.

२०१८ पासून चलनात २ हजार रु.च्या नोटा कमी आल्याचे रिझर्व्ह बँकेचे म्हणणे आहे. मार्च २०१८च्या अखेरीस चलनात २ हजार रु.च्या नोटांची संख्या ३३,६३२ लाख होती ती २०१९च्या मार्च अखेर ३२,९१० अशी खाली आली. नंतर २०२०च्या मार्च अखेर नोटांची संख्या २७,३९८ लाख इतकी घसरल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

२००० रु. नोटेची मार्च २०२० मध्ये एकूण चलनातील टक्केवारी २२.६ होती. ती २०१९च्या मार्चमध्ये ३१.२ टक्के तर २०१८च्या मार्च अखेर ३७.३ टक्के इतकी होती.

या अहवालात २०१८पासून २०२०पर्यंतच्या काळात ५०० रु. व २०० रु.च्या नोटांच्या संख्येत वाढ व चलन व्यवहारात वाढ झाल्याचे म्हटले आहे. २०१९-२०च्या काळात ५०० रु.च्या १,४६३ कोटी नोटा छपाईची ऑर्डर दिली होती पण प्रत्यक्षात १२०० कोटी नोटा मिळाल्या. तसेच २०१८-१९मध्ये १,१६९ कोटी नोटांच्या छपाईची ऑर्डर दिली होती पण प्रत्यक्षात १,१४७ कोटी नोटा छापण्यात आल्या.

या नोटांशिवाय १०० रु.च्या ३३० कोटी, ५० रु.च्या २४० कोटी, २०० रु. २०५ कोटी, १० रु. १४७ कोटी, २० रु.च्या १२५ कोटी नोटा छपाईची ऑर्डर देण्यात आली होती.

२०१९-२० या आर्थिक वर्षांत २,९६,६९५ बनावट नोटा पकडण्यात आल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0