बजरंग दलाने मंगळुरूत पबमध्ये कॉलेज पार्टी उधळली

बजरंग दलाने मंगळुरूत पबमध्ये कॉलेज पार्टी उधळली

हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महिलांनी पार्टी करण्यावर आक्षेप घेतला आणि 'बेकायदेशीर कृत्यांमध्ये' सहभागी असल्याचा आरोप केला.

प्रियंकांना नोटीस; अडवाणी-जोशी नियमाला अपवाद
अधीर रंजन चौधरींनी मागितली राष्ट्रपतींची माफी
जीएसटीः ‘केंद्रानेच उधारी घेऊन आमचा वाटा द्यावा’

नवी दिल्ली: बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी, २६ जुलै रोजी संध्याकाळी कर्नाटकातील मंगळुरू येथील एका पबमध्ये भारतीय संस्कृतीचे उल्लंघन केल्याचा आरोप करीत महाविद्यालयीन पार्टी उधळून लावली, अशी बातमी ‘द न्यूज मिनिट’ने दिली आहे.

या घटनेच्या सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये हिंदुत्ववादी संघटनेचे सदस्य पार्टी करणाऱ्यांवर शिवीगाळ करताना दिसत आहेत. मंगळुरू येथील ‘रीसायकल: द लाउंज’ या पबमध्ये ही घटना घडली.

हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी महिलांच्या पार्टी करण्यावर आक्षेप घेतला आणि पार्टी करणाऱ्यांवर बेकायदेशीर गोष्टी केल्याचा आरोप केला.

गेल्या आठवड्यात दोन तरुण एका खाजगी अपार्टमेंटमध्ये चुंबन घेत असताना त्यांचे मित्र त्यांना प्रोत्साहन देत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्याला प्रतिक्रिया म्हणून हा हल्ला झाल्याचे मानले जात आहे.

“गेल्या आठवड्यात सेंट अलॉयसियस कॉलेजमधील विद्यार्थ्यांचा ‘लिप लॉक’ चॅलेंज करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता त्याच कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पार्टी केली होती. बजरंग दल सदस्यांनी पोलिसांना माहिती दिली आणि पार्टी थांबवण्यात आली,” असे न्यूज मिनिट रिपोर्टमध्ये बजरंग दलाचे जिल्हा प्रमुख शरण पंपवेल यांनी सांगितले.

व्हिडिओला प्रतिक्रिया म्हणून, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या गटावर लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु, पोलिसांनी सांगितले की हा व्हिडिओ सहा महिन्यांच्या पूर्वीचा आणि विद्यार्थी खेळत असतानाचा आहे.

सोमवारच्या घटनेबद्दल, मंगळुरू पोलिसांनी पबवर हल्ला झाल्याचे नाकारले आहे. पोलिसांनी सांगितले, की बजरंग दलाचे कार्यकर्ते केवळ अल्पवयीन मुलांना दारू दिली जात आहे का, याची चौकशी करण्यासाठी पबमध्ये बाउन्सरकडे गेले होते.

“सोशल मीडियावर पबवर हल्ला झाल्याची बातमी पसरली होती. कोणत्याही पब किंवा रेस्टॉरंटवर हल्ला झालेला नाही,” असे मंगळुरूचे पोलीस आयुक्त शशी कुमार यांनी एनडीटीव्हीला सांगितले आहे.

स्थानिक पोलिसांनी जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे, की त्यांना सोमवारी, २५ जुलै रोजी रात्री ८ च्या सुमारास “काही बेकायदेशीर कृत्ये होत आहेत,” अशी माहिती माध्यमांद्वारे मिळाली होती. पोलिस घटनास्थळी पोहोचले तोपर्यंत पब होता. बंद होत होता आणि सुमारे २० मुले आणि १० मुली घटनास्थळावरून निघून जाताना दिसली. कोणताही हल्ला झाला नाही, असे आयुक्तांनी सांगितले.

खरेतर, ही घटना दुसर्‍या हिंदुत्ववादी संघटनेच्या, विश्व हिंदू परिषदेने, खाजगी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांवर “ड्रग्ज आणि सेक्स माफिया” चालवत असल्याचा आरोप करणारे निवेदन जारी केल्यानंतर घडली. तसेच हे संदेश देणारे एक पोस्टर जारी केले आणि इंटरनेटवर मोठ्या प्रमाणावर  प्रसारित केले होते.

‘रीसायकल’ पब जिथे सोमवारची घटना घडली त्याच ठिकाणी ‘अम्नेशिया’ पब अस्तित्वात होता आणि २००९ मध्ये प्रसिद्धीच्या झोतात आला होता, जेव्हा श्री रामा सेने गटाच्या हिंदुत्व कार्यकर्त्यांनी तेथे पार्टी करणाऱ्या पुरुष आणि महिलांना मारहाण केली होती.

त्यानंतर झालेला हल्ला कॅमेऱ्यात कैद झाला होता, त्यात काही पुरुष महिलांना चापट मारताना, केसांनी ओढून बाहेर काढताना आणि दिवसाढवळ्या त्यांच्यावर क्रूरपणे मारहाण करताना दिसत होते. त्या घटनेने वाद निर्माण झाला होता आणि हल्लेखोरांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले होते.

मात्र, २०१८ मध्ये, २००९ च्या त्या घटनेच्या नऊ वर्षानंतर, आरोपी श्री राम सेनेचे संस्थापक प्रमोद मुथालिक आणि इतर ३० जणांना मंगळुरू न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले होते.

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0