सर्वोच्च न्यायालयात ९३१ जामीन अर्ज प्रलंबित

सर्वोच्च न्यायालयात ९३१ जामीन अर्ज प्रलंबित

नवी दिल्लीः सर्वोच्च न्यायालयात विविध प्रकरणाअंतर्गत ९३१ जामीन अर्ज प्रलंबित आहेत. यात अंतरिम, कायमस्वरुपी व अटकपूर्व जामीन अर्ज आहे. त्याच बरोबर शिक्

छत्तीसगढमध्ये गावकऱ्यांनी घेतली मुस्लिमविरोधी शपथ
इतिहासात वैश्विकदृष्टी मांडणारा अभ्यासक
विज्ञान आणि विद्वत्ता यांच्यावरील सर्जिकल स्ट्राईक

नवी दिल्लीः सर्वोच्च न्यायालयात विविध प्रकरणाअंतर्गत ९३१ जामीन अर्ज प्रलंबित आहेत. यात अंतरिम, कायमस्वरुपी व अटकपूर्व जामीन अर्ज आहे. त्याच बरोबर शिक्षा निलंबित करावी या संदर्भात १४१ याचिका प्रलंबित आहे. हा खुलासा माहिती अधिकार कार्यकर्ते साकेत गोखले यांनी सादर केलेल्या अर्जातून झाला आहे. रिपब्लिक इंडिया न्यूज चॅनेलचे संपादक अर्णव गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयाने आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या प्रकरणात जामीन मंजूर केला होता. त्यावर साकेत गोखले यांनी सर्वोच्च न्यायालयात हंगामी जामीनाचे किती अर्ज पडून आहेत, याची माहिती मागवली होती.

अर्णव गोस्वामी यांना अटक केल्यानंतर लगेचच दुसर्या दिवशी दिवाळीच्या काळात सुटी असूनही सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या जामीनावर तात्काळ सुनावणी घेतली होती.

लाइव्ह लॉने दिलेल्या वृत्तानुसार गोखले यांनी प्रलंबित असलेल्या हंगामी जामीन अर्जांची माहिती सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीकडे मागितली होती. यावर सर्वोच्च न्यायालयाचे अतिरिक्त रजिस्ट्रार व सेंट्रल पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर अजय अगरवाल यांनी सर्वोच्च न्यायालय हंगामी जामीन अर्जांची माहिती ठेवत नसल्याचे उत्तर दिले होते. पण त्यांनी प्रलंबित जामीन अर्ज व शिक्षा निलंबन करण्यासंदर्भातील आकडेवारी दिली.

गोखले यांनी हंगामी अर्ज दाखल केल्यानंतर तो अर्ज बेंचपुढे येण्यासाठी साधारण किती दिवस लागतात याची माहिती मागवली होती. पण अशी माहिती आमच्याकडे नाही, असे सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार यांनी सांगितले.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0