मी चिथावणीखोर भाषण दिले नाहीः कपिल मिश्रा

मी चिथावणीखोर भाषण दिले नाहीः कपिल मिश्रा

नवी दिल्लीः दिल्लीत दंगल घडावी असे माझे भाषण नव्हते तर त्या भागातला तणाव कमी करण्यासाठी आपण तेथे गेलो होते, असा जबाब दिल्ली दंगलीला कारणीभूत असल्याचा

भाजपने सहा महिन्यांत पाच मुख्यमंत्री बदलले
जामियातील दडपशाही : लखनौ, हैदराबाद, मुंबईतील विद्यार्थी रस्त्यावर
पत्रकाराला गायब करण्याची भाजप नेत्याकडून धमकी

नवी दिल्लीः दिल्लीत दंगल घडावी असे माझे भाषण नव्हते तर त्या भागातला तणाव कमी करण्यासाठी आपण तेथे गेलो होते, असा जबाब दिल्ली दंगलीला कारणीभूत असल्याचा आरोप असलेले भाजपचे नेते कपिल मिश्रा यांनी दिल्ली पोलिसांकडे नोंद केला आहे. गेल्या जुलै महिन्यात कपिल मिश्रा यांची दिल्ली पोलिसांनी चौकशी केली होती, त्या चौकशीत आपली बाजू मांडताना मिश्रा म्हणाले की, मी चिथावणीखोर भाषण दिले नव्हते, माझ्या बाजूला एक डीसीपी उभे होते. त्यावेळी माझ्या म्हणण्याचा अर्थ एवढाच होता की सीएएविरोधातल्या निदर्शकांच्या विरोधात आम्हीही आंदोलन करणार आहोत.

कपिल मिश्रा यांचा हा जबाव दिल्ली पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या दंगलीसंदर्भातील आरोपपत्रात नमूद केला आहे. हे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने प्रसिद्ध केले आहे.

दिल्लीत दंगल भडकण्याच्या अगोदर २३ फेब्रुवारीला कपिल मिश्रा यांनी एक व्हीडिओ ट्विट केला होता. या व्हीडिओत ते मौजपूर सिग्नलपाशी सीएए समर्थकांच्या गर्दीला संबोधित करत होते. या व्हीडिओत ईशान्य दिल्लीचे डीसीपी वेदप्रकाश सूर्या उपस्थित होते. या वेळी कपिल मिश्रा म्हणाले की, ते (सीएएविरोधक) दिल्लीत तणाव निर्माण करू पाहात आहेत. त्यामुळे रस्ते बंद केले जात आहे. त्यांनी दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. आम्ही दगडफेक केलेली नाही. आमच्यापुढे डीसीपी उभे आहेत आणि त्यांना मी तुमच्यातर्फे सांगू इच्छितो की, अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प भारतात असेपर्यंत आम्ही या भागात शांतता पाळू. तोपर्यंत जर रस्ते मोकळे झाले नाहीत तर आम्ही तुमचेही (पोलिस) ऐकणार नाही. आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल.

मिश्रा यांनी जबानीत आपण भडकाऊ भाषण दिले नव्हते असे अनेकवेळा सांगितले आहे. तीन दिवसांत निदर्शकांकडून रस्ते मोकळे व्हावेत असे आपण पोलिसांना सांगत होतो, असा दावा त्यांनी केला आहे.

मिश्रा यांना ते मौजपूर येथे का गेले होते, असा प्रश्न विचारला असता त्यांनी काही स्थानिक नागरिकांनी त्यांच्या भागातले रस्ते बंद केले म्हणून आपल्याला फोन केला होता. ती परिस्थिती पाहण्यासाठी तेथे गेलो होतो, असा मिश्रा यांनी बचाव केला.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: