महान टेनिसपटू रॉजर फेडररची निवृत्तीची घोषणा

महान टेनिसपटू रॉजर फेडररची निवृत्तीची घोषणा

सुमारे अडीच दशके टेनिस विश्वावर वर्चस्व गाजवलेल्या जगविख्यात टेनिसपटू रॉजर फेडरर याने गुरुवारी अचानक आपण एटीपी टूर व ग्रँड स्लॅम स्पर्धेतून निवृत्ती घ

‘राज्य निवडणूक आयोगाचे काम भाजपच्या आयटी सेलकडे’
बदलत्या भारतात प्रेमात पडणे धोकादायक
सागर सरहदी – संस्कृतीचा ‘शहाणपणा’ सांभाळणारा माणूस !

सुमारे अडीच दशके टेनिस विश्वावर वर्चस्व गाजवलेल्या जगविख्यात टेनिसपटू रॉजर फेडरर याने गुरुवारी अचानक आपण एटीपी टूर व ग्रँड स्लॅम स्पर्धेतून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. फेडररच्या या अचानक केलेल्या निवृत्तीच्या घोषणेने जगभरातील लाखो फेडरर चाहत्यांमध्ये निराशा निर्माण झाली. सोशल मीडियात फेडररच्या एकूण कारकिर्दीवर चाहत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत या महान खेळाडूला अभिवादन केले.

आपल्या निवृत्तीसंदर्भात फेडररने एक पत्र इन्स्टाग्राम, फेसबुकवर प्रसिद्ध केले. या पत्रात त्याने आता आपण ४१ वर्षांचे झालो असून २४ वर्षांच्या टेनिस कारकिर्दीत आपण १५०० हून अधिक सामने खेळलो. या खेळाने स्वप्नातही वाटले नाही इतके सर्व काही दिले. पण आता स्पर्धात्मक करिअरमध्ये थांबायला हवे असे वाटते त्यामुळे निवृत्त होत असून एटीपी, ग्रँडस्लॅम व्यतिरिक्त अन्य टेनिस स्पर्धांमध्ये आपला सहभाग असेल असे स्पष्ट केले. गेले तीन वर्षे दुखापती व शस्त्रक्रियांमुळे आपल्या पुढे अनेक आव्हाने आली होती. आपण त्यात खेळण्याचे प्रयत्नही केले. पण आता माझ्या शरीराची क्षमता, मर्यादा लक्षात येत आहे, निवृत्ती हेच त्यावर उत्तर असल्याचे फेडररने म्हटले आहे.

फेडररने आपल्या पत्रात आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंनाही धन्यवाद दिले आहेत. काही सहकाऱ्यांविरोधात खेळलेले अविस्मरणीय सामने आपण विसरू शकत नाही. आम्ही खेळाडू म्हणून अत्यंत संघर्ष कायम ठेवत सामने खेळले. या सामन्यात सर्वोत्तम कामगिरी व्हावी म्हणूनही मनापासून प्रयत्न केले. या सगळ्यांचा आपण ऋणी असल्याचे फेडररने म्हटले आहे.

गेली तीन वर्षे फेडरर स्वतःचा फॉर्म शोधत होता. २०२०मध्ये त्याला गुडघे दुखीने सतावले होते, त्यात त्याच्या गुडघ्यावर दोन शस्त्रक्रियाही झाल्या होत्या. एक शस्त्रक्रिया २०२१च्या विम्बल्डन स्पर्धेत उपउपांत्य फेरीत सामना हरल्यानंतर झाली होती.

आपल्या २४ वर्षांच्या प्रदीर्घ करिअरमध्ये फेडररने २२ ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या असून अनेक विश्वविक्रम त्यांच्या नावावर आहेत. तरुण वयात रँकिंगमध्ये प्रथम तो होताच पण ३६ वर्षी पहिले रँकिंग मिळवणारा व हे रँकिंग सलग २३७ आठवडे कायम ठेवणारा तो टेनिस विश्वातला सर्वोत वयोवृद्ध खेळाडूही ठरला.

फेडररने आजपर्यंत ६ ऑस्ट्रेलियन ओपन, एकदा फ्रेंच ओपन, ५ वेळा अमेरिकन ओपन व ८ वेळा विम्बल्डन स्पर्धा (विक्रम) जिंकण्याचा पराक्रम केला आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0