घरगुती विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या दरात ५० रु.ची वाढ

घरगुती विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या दरात ५० रु.ची वाढ

नवी दिल्लीः घरगुती विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या दरात आज अचानक ५० रु.नी वाढ करण्यात आली. मे ते जुलै दरम्यानच्या काळात ही तिसरी दरवाढ असून १४.२ किलोच्या विनाअनुदानित सिलेंडरची किंमत आता १०५३ रु. झाली आहे. या दरवाढीचा बोजा विना अनुदानित गॅस सिलेंडर धारकांना सोसावा लागणार आहे. मोदी सरकारच्या बहुचर्चित उज्ज्वला योजनेत अनुदानित सिलेंडर दिले जातात त्यांच्यासाठी ही दरवाढ नाही.

गेल्या १९ मे रोजी घरगुती सिलेंडरच्या दरात ३.५० रु.ची अचानक वाढ करण्यात आली होती. त्या अगोदर ५० रु.ची वाढ करण्यात आली होती.

तेलकंपन्यांनी विनाअनुदानित गॅस सिलेंडरची अधिकवेळा दरवाढ केली असली तरी देशातील आता बहुतांश शहरांमध्ये केंद्र सरकारकडून गॅस सिलेंडरवरची सबसिडी ग्राहकांना दिली जात नाही.त्यामुळे बहुसंख्य ग्राहकांना विना अनुदानित गॅस सिलेंडरचा खरेजी करावा लागतो.

मुंबईत आता नव्या दरवाढीनुसार गॅस सिलेंडर १०५२.५० रु. तर चेन्नईमध्ये १०६८.५० रु. आणि कोलकातामध्ये १०७९ रुपये इतका झाला आहे.

COMMENTS