वॉशिंग्टनः तालिबानचे संस्थापक मुल्ला अब्दुल गनी बरादर यांच्याशी सोमवारी अमेरिकेच्या सीआयए या गुप्तचर खात्याचे प्रमुख विल्यम बर्न्स यांनी काबुलमध्ये गु
वॉशिंग्टनः तालिबानचे संस्थापक मुल्ला अब्दुल गनी बरादर यांच्याशी सोमवारी अमेरिकेच्या सीआयए या गुप्तचर खात्याचे प्रमुख विल्यम बर्न्स यांनी काबुलमध्ये गुप्त बैठक केल्याचे वृत्त द वॉशिंग्टन पोस्ट या दैनिकाने दिले आहे.
बर्न्स हे बायडन प्रशासनातील अनुभवी राजनयिक समजले जातात. तर बरादर यांनी कतारमध्ये तालिबानतर्फे अमेरिकेशी यशस्वी वाटाघाटी केल्या होत्या.
पण बरादर-बर्न्स भेटीबाबत सीआयए प्रशासनाने कोणतेही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. वॉशिंग्टन पोस्टने आपले वृत्त अज्ञात सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. आम्हाला या चर्चेची अधिकृत माहिती मिळालेली नाही, असेही पोस्टचे म्हणणे आहे.
गेल्या आठवड्यात अफगाणिस्तानात तालिबानने सत्ता मिळवल्यानंतर तेथे अजूनही अस्थिर परिस्थिती असून अमेरिकेसह जगातील अनेक देशांचे हजारो नागरिक अडकलेले आहेत. या नागरिकांची सहीसलामत सुटका करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दबाव तालिबानवर आहे. अमेरिकेने अफगाणिस्तानात पुन्हा हिंसाचाराचा उद्रेक होऊ नये म्हणून आपले काही शेकडो सैनिकही तेथे तैनात केले आहेत. अमेरिका व ब्रिटनने आपले अफगाणिस्तानातील तैनात सैनिक व नागरिकांना ३१ ऑगस्टपर्यंत मायदेशी परत नेणार असल्याचे पूर्वीच जाहीर केले आहे.
मूळ बातमी
COMMENTS