एडवर्ड स्नोडेन रशियाचा स्थायी निवासी

एडवर्ड स्नोडेन रशियाचा स्थायी निवासी

मॉस्कोः अमेरिकेची गुप्तहेर संघटना सीआयएकडून जगावर पाळत ठेवल्यासंदर्भातील माहिती उघड करणारा सीआयएचा माजी कर्मचारी एडवर्ड स्नोडेन याला रशिया सरकारने रशि

चे, फिडेल आणि मॅराडोना
मुंबई पोलिसांकडून अजब तपासणी
टेंडर टक्केवारी, पंजाबात आरोग्यमंत्र्याची हकालपट्टी

मॉस्कोः अमेरिकेची गुप्तहेर संघटना सीआयएकडून जगावर पाळत ठेवल्यासंदर्भातील माहिती उघड करणारा सीआयएचा माजी कर्मचारी एडवर्ड स्नोडेन याला रशिया सरकारने रशियात राहण्याची कायमस्वरुपाची परवानगी दिली आहे. रशियाने अशी परवानगी दिल्याने स्नोडेन याचा रशियाचे नागरिकत्व मिळवण्याचा मार्ग अधिक सोपा झाला आहे.

एडवर्ड स्नोडेन सीआयएचा माजी कर्मचारी होता आणि त्याने २०१३मध्ये सीआयएकडून होणार्या हेरगिरीसंदर्भातील माहिती जगापुढे ठेवल्याने खळबळ माजली होती. त्यानंतर स्नोडेन याने अमेरिकेतून पलायन करून रशियात आश्रय घेतला होता. स्नोडेनवर हेरगिरीचे आरोप अमेरिकेने ठेवले आहेत व त्याला ताब्यात घेण्यासाठी अनेक वर्ष प्रयत्न सुरू आहेत. गेल्या वर्षी त्याने आपल्याविरोधातील न्यायालयीन कारवाई निष्पक्ष पद्धतीने होत असल्याचे आश्वासन मिळाल्यास अमेरिकेत परत येऊ असा प्रस्ताव ठेवला होता पण नंतर तो प्रस्ताव बारगळला होता.

गेल्या ऑगस्टमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्नोडेनला माफी देण्यात येईल अशी घोषणा केली होती.

सध्या स्नोडेन रशियात सार्वजनिक जीवनात कोणाशीही मिसळत नाहीत. तो सोशल मीडियाच्या माध्यमातून रशियन सरकारच्या धोरणावरही टीका करत असतो पण त्याच बरोबर रशियातील निसर्ग सौंदर्य व तेथील नागरी जीवन यावर तो आपली मते व्यक्त करत असतो.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0