हैदराबाद बलात्कार प्रकरणातील ४ आरोपींचे एन्काउंटर

हैदराबाद बलात्कार प्रकरणातील ४ आरोपींचे एन्काउंटर

हैदराबाद : २७ नोव्हेंबर रोजी एका महिला डाॅक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करणार्या चार आरोपींचे शुक्रवारी पहाटे हैदराबाद पोलिसांकडून एन्काउंटर झाले.

दिल्ली हिंसाचाराबद्दल इतकं दीर्घ मौन का?
वॉशिंग्टनमधल्या घटनेतून भारताने काय धडे घ्यावेत?
भारतातील ‘कम्युनल ट्रँगल’

हैदराबाद : २७ नोव्हेंबर रोजी एका महिला डाॅक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करणार्या चार आरोपींचे शुक्रवारी पहाटे हैदराबाद पोलिसांकडून एन्काउंटर झाले.
या चारही आरोपींना घटनास्थळी आणण्यात आले होते व त्यांनी हा गुन्हा कसा केला याची माहिती पोलिसांकडून घेतली जात होती. याच वेळी या चार आरोपींपैकी एकाआरोपीने पळून जाण्यासाठी तिघांजणांना उद्युक्त करण्याचा प्रयत्न केला व पोलिसांवर हल्लाही करण्याचा प्रयत्न केला.
आरोपींच्या हल्ल्यामुळे स्वसंरक्षणार्थ म्हणून पोलिसांनी या चारही आरोपींना ठार मारले.
२७ नोव्हेंबरच्या घटनेने देशभर संतापाची लाट पसरली होती. संसदेतही त्याचे पडसाद उमटले होते. तेलंगण सरकारने या प्रकरणाचा लवकर निकाल लागावा म्हणून जलद न्यायालय स्थापन
केले होते.
शुक्रवार रात्री ही घटना कशी घडली याची माहिती हैदराबाद पोलिस आरोपींकडून घेत होते. त्या दरम्यान हे एन्काउंटर झाले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0