मॉस्कोः कोरोना विषाणूंवर रशियाने विकसित केलेल्या Sputnik V लसीने कोरोना रुग्णांमध्ये प्रतिकार शक्ती निर्माण केल्याचे ‘द लँसेट’ या वैद्यकीय नियतकालिकात
मॉस्कोः कोरोना विषाणूंवर रशियाने विकसित केलेल्या Sputnik V लसीने कोरोना रुग्णांमध्ये प्रतिकार शक्ती निर्माण केल्याचे ‘द लँसेट’ या वैद्यकीय नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या संशोधन अहवालात नमूद करण्यात आले आहे. क्लिनिकल चाचणीसाठी जेवढ्या कोरोनाबाधित रुग्णांवर लसीचे प्रयोग केले होते, त्या रुग्णांच्या प्रकृतीवर कोणताही विपरीत परिणाम झाला नाही, त्यांना ताप आला तोही सौम्य होता व त्यांच्यामध्ये प्रतिकारक शक्ती निर्माण झाली असे ‘द लँसेट’मध्ये नमूद करण्यात आले आहे.
Sputnik V या लसीच्या पहिल्या व दुसर्या चाचणीत कोरोनाबाधित रुग्णांच्या शरीरात प्रतिकारक शक्ती निर्माण झाली असे लँसेटच्या अहवालात म्हटले आहे. या रुग्णांच्या शरीरात लसीनंतर प्रतिकारक शक्ती निर्माण होणे व नैसर्गिक दृष्ट्या एखाद्याच्या शरीरात प्रतिकारक शक्ती निर्माण होणे यात फारसा फरक आढळलेला नाही, असेही या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. संशोधकांनी ‘टी’ पेशीवरही लक्ष केंद्रीत ठेवले होते. Sputnik V लस टोचल्याने कोरोना रुग्णांच्या शरीरात २८ दिवसांनी ‘टी’ पेशी तयार होतात, असे दिसून आले आहे.
Sputnik Vची जेवढ्या रुग्णांवर चाचणी घेतली होती, त्यातील अर्ध्या रुग्णांना ताप आला. ४२ टक्के रुग्णांना डोकेदुखी आली. त्याचबरोबर यातील २८ टक्के रुग्णांना अशक्तपणा व २४ टक्के रुग्णांना सांधेदुखी जाणवली.
लॅन्सेटच्या अहवालात लसीचे दुष्परिणाम किती काळ राहतात यावर माहिती नाही पण जे परिणाम रुग्णांना जाणवले ते अत्यंत सौम्य होते, असे नमूद करण्यात आले आहे.
पण काही संशोधकांचे म्हणणे आहे, की या लशीची चाचणी कमी रुग्णांवर घेतल्यामुळे ही लस किती गुणकारी व प्रभावी आहे, याबाबत साशंकता आहे. पण आता आलेले निष्कर्ष सकारात्मक संकेत आहेत, तिसर्या क्लिनिकल चाचणीनंतर या लशीच्या योग्यतेवर शिक्कामोर्तब होईल, असे संशोधक म्हणत आहेत.
गेल्या महिन्यात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी Sputnik Vची दुसरी चाचणी यशस्वी झाल्याचा दावा केला होता. आपल्या मुलीवर ही लस टोचण्यात आली व तिच्यावर लसीचा सकारात्मक परिणाम झाला असे त्यांनी जाहीर सांगितले होते. पण लसीच्या तिसर्या चाचणीचे अहवाल येण्याअगोदर रशियाने आपण कोरोनावर लस विकसित केल्याच्या दावा केल्याने त्यांच्यावर वैद्यकीय क्षेत्रातून आश्चर्य व साशंकता व्यक्त केली गेली.
गेल्या सहा महिन्यांपासून रशियाने कोरोनावर लस विकसित करण्याचे प्रयत्न सुरू केले होते. मॉस्कोतील गामेल्या राष्ट्रीय संशोधन केंद्रात ही लस विकसित केली जात असून २८ ऑगस्टपासून ४० हजार रुग्णांवर या लशीची तिसरी टप्प्यातील चाचणी सुरू करण्यात आली आहे.
मूळ बातमी
COMMENTS