तिसरे महायुद्ध विनाशकारी असेल: सिर्गेइ लाव्हरोव्ह

तिसरे महायुद्ध विनाशकारी असेल: सिर्गेइ लाव्हरोव्ह

कीव्ह/वॉशिंग्टन/मॉस्को/नवी दिल्ली/बीजिंग/ब्रूसेल्स: रशियाचे परराष्ट्र मंत्री सिर्गेइ लाव्हरोव्ह यांनी बुधवारी इशारा दिला, की जर तिसरे महायुद्ध झाले तर

निवडणुकांच्या तोंडावर उ. प्रदेश, पंजाबात मंत्रिमंडळ विस्तार
रावत तिन्ही दलाचे नवे प्रमुख, नरवणे नवे लष्करप्रमुख
मदरसे बंद करणे मुस्लिमांच्या हितासाठीच: हिमंता बिस्वा शर्मा

कीव्ह/वॉशिंग्टन/मॉस्को/नवी दिल्ली/बीजिंग/ब्रूसेल्स: रशियाचे परराष्ट्र मंत्री सिर्गेइ लाव्हरोव्ह यांनी बुधवारी इशारा दिला, की जर तिसरे महायुद्ध झाले तर ते ‘अण्वस्त्र आणि विनाशकारी’ असेल.

युक्रेनविरुद्ध मॉस्कोच्या सुरू असलेल्या मोठ्या लष्करी कारवाईवरून पश्चिमेसोबतच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर त्यांचा इशारा आला आहे.

रशियाची सरकारी वृत्तसंस्था ‘तास’ने दिलेल्या माहितीनुसार, लाव्हरोव्ह यांनी अल जझीरा टेलिव्हिजन वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, तिसरे महायुद्ध हे विनाशकारी आण्विक युद्ध असेल.

त्याच वेळी, लाव्हरोव्ह यांनी अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या वक्तव्यावर बोलताना सांगितले, की तिसरे महायुद्ध हे मॉस्कोविरुद्ध वॉशिंग्टनच्या कठोर निर्बंधांना पर्याय असेल.

लाव्हरोव्ह म्हणाले की रशिया त्याच्यावर लादलेल्या निर्बंधांसाठी तयार होताच, परंतु खेळाडू आणि पत्रकार यांच्यावरही कारवाई करण्यात आल्याने आश्चर्य वाटले.

पाश्चिमात्य देशांनी लादलेल्या निर्बंधांचा संदर्भ देताना ते म्हणाले, “आम्ही निर्बंधांसाठी तयार होतो, परंतु त्यांचा खेळाडू, विचारवंत, अभिनेते आणि पत्रकारांवर परिणाम होईल अशी अपेक्षा नव्हती.”

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0