रशियन सैन्याचा खार्किव्हमध्ये रॉकेट हल्ला

रशियन सैन्याचा खार्किव्हमध्ये रॉकेट हल्ला

युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्या कार्यालयाने सांगितले, की चर्चा पुन्हा सुरू होईल तेव्हा ते रशियाकडे तात्काळ युद्धविरामाची मागणी करतील.

हे अधांतरत्व माझ्या नेणीवेत जाऊन बसलं असेल..
ईव्हीएमवर राज ठाकरे यांचा निशाणा
एन. डी. पाटील यांचे निधन

खार्किव्ह/कीव्ह /मॉस्को/वॉशिंग्टन/द हेग/नवी दिल्ली/व्हिएन्ना/जिनेव्हा: सोमवारी सकाळी युक्रेनच्या खार्किव्ह शहरावर रशियन सैन्याने केलेल्या रॉकेट हल्ल्यात डझनभर लोक मारले गेले, असे युक्रेनच्या गृह मंत्रालयाचे सल्लागार अँटोन हेरॅश्चेन्को यांनी सांगितले.

इंटरनॅशनल न्यूज एजन्सी रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी फेसबुकवरील पोस्टमध्ये म्हटले आहे, की ‘ग्रॅड्स (रॉकेट्स) ने खार्किव्हवर मोठ्या प्रमाणावर हल्ला केला होता. त्यात डझनभर ठार आणि शेकडो जखमी झाले.

‘अल जझीरा’ने वृत्त दिले आहे, की हेरॅश्चेन्को यांच्या वक्तव्यावर मॉस्कोकडून त्वरित कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

अल जझीराचे वार्ताहर जोनाह हल हे पश्चिम युक्रेनमधील ल्विव्ह शहरातून युद्धाच्या बातम्या देत आहेत. ते म्हणाले, की दाट लोकवस्तीच्या नागरी भागांवर रशियन हल्ल्यांचे वृत्त भयानक आहे.

ते म्हणाले, “सोशल मिडियावर माहिती येत आहे, की तेथे स्फोट झाले आहेत आणि ते ग्रॅड रॉकेटचे हल्ले आहेत, तसेच हवेतही बॉम्बस्फोट करण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त, क्लस्टर युद्धसामग्रीचा वापर दर्शविणारे इतर अनेक व्हिडिओ आले आहेत.”

राजधानी कीव्हमध्ये तुलनेने शांत वातावरण होते, जिथे सोमवारी सुपरमार्केट पुन्हा उघडण्यात आले आणि शनिवारी कर्फ्यू लागू झाल्यानंतर रहिवाशांना प्रथमच घरे सोडण्याची परवानगी देण्यात आली.

दुसरीकडे, युक्रेनच्या अध्यक्ष कार्यालयाने सोमवारी सांगितले, की रशियाशी चर्चेसाठी एक शिष्टमंडळ बेलारूस सीमेवर पोहोचले आहे. या चर्चेतून युद्धावर तोडगा निघेल की नाही हे स्पष्ट नाही.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्या कार्यालयाने सांगितले, की ते रशियाकडे तात्काळ युद्धविरामाची मागणी करतील. युक्रेनमधील युद्धातून किंवा चर्चेतून रशियाला शेवटी काय हवे आहे हे लगेच स्पष्ट झालेले नाही.

रशियाच्या हल्ल्यात युक्रेनच्या १६ मुलांचा मृत्यू झाला असून ४५ जण जखमी झाल्याचे युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी म्हटलं आहे.

सुमारे 3 दशलक्ष लोकसंख्या असलेल्या किव्ह या शहराजवळ रशियन सैन्य आल्याचे वृत्त आहे आणि खार्किव्हमध्ये रस्त्यांवर मारामारी सुरू झाली आहे. दक्षिणेतील मोक्याची बंदरे हल्लेखोरांच्या दबावाखाली येत आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0