दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील परिस्थिती जैसे थे ठेवण्यास सांगितले असून, दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आम्ही निकाल देऊ असे सांगितले. शिव
दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील परिस्थिती जैसे थे ठेवण्यास सांगितले असून, दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आम्ही निकाल देऊ असे सांगितले. शिवसेनेच्या आमदारांना १२ जुलैपर्यंत आपले म्हणणे मांडण्यासाठी वेळ दिली आहे. त्यामुळे आता १२ जुलैपर्यंत आमदारांना अपात्र ठरवता येणार नाही.
महाविकास आघाडी अल्पमतात असल्याचा दावा एकनाथ शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात केला होता. ३८ आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. तसेच उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्यात आल्याने, त्यांना अपात्र ठरविण्याचा अधिकार नसल्याचा मुद्दा मांडण्यात आला आहे.
११ जुलैपर्यंत आमदारांच्या अपात्रतेबाबत कोणतीही कारवाई केली जाणार नाही असे आश्वासन उपाध्यक्षांची बाजू मांडणारे वकील धवन यांनी न्यायालयात सांगितले. त्यावर एकनाथ शिंदे गटाच्या वकिलांनी हे विधान रेकॉर्डवर घ्यावे वं अशी विनंती केली. सिंघवी यांनी यावर सांगितलं की, सामान्यत: कोर्ट अध्यक्षांच्या वतीने केलेले विधान रेकॉर्ड करणार नाहीत. कारण ते त्यांच्या अधिकारात हस्तक्षेप करण्यासारखं आहे.
शिवसेनेचे वकील कामत यांनी यावर कोणत्याही न्यायालयाने कधीही अपात्रतेच्या प्रक्रियेला स्थगिती दिलेली नाही, असा युक्तिवाद केला. यावर उपाध्यक्षांचे अधिकार न्यायकक्षेच्या बाहेर आहेत हे सिद्ध करा असे न्यायलयाने सांगितले आणि आमदारांना १२ जुलैपर्यंत वेळ वाढवून दिली.
खात्यांचे फेरवाटप
पाच मंत्री आणि चार राज्यमंत्री यांच्याकडील खाती इतर मंत्र्यांना सोपविण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.
एकनाथ शिंदे यांच्याकडील नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) खाती सुभाष देसाई यांच्याकडे, गुलाबराव रघुनाथ पाटील यांच्याकडील पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग हे खाते अनिल परब यांच्याकडे, दादा भुसे यांच्याकडील कृषि व माजी सैनिक कल्याण खाते तसेच संदिपान आसाराम भुमरे यांच्याकडील (रोजगार हमी, फलोत्पादन) खाते शंकर गडाख यांच्याकडे, उदय सामंत यांच्याकडील उच्च व तंत्र शिक्षण खाते आदित्य ठाकरे यांच्याकडे देण्यात आले आहे.
राज्य मंत्र्याकडील खातेवाटपात बदल:
शंभूराज देसाई यांच्याकडील खाती संजय बनसोडे (गृह ग्रामीण), विश्वजित पतंगराव कदम (वित्त, नियोजन, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन), सतेज पाटील यांच्याकडे काही खाती सोपवण्यात आली आहेत. राजेंद्र यड्रावकर यांच्याकडील खाती (कंसात) विश्वजित पतंगराव कदम, राज्यमंत्री (सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण), प्राजक्त प्रसाद तनपुरे, राज्यमंत्री (वैद्यकीय शिक्षण, वस्त्रोद्योग),सतेज उर्फ बंटी डी. पाटील, राज्यमंत्री (अन्न व औषध प्रशासन),आदिती सुनिल तटकरे, राज्यमंत्री (सांस्कृतिक कार्य)
अब्दुल नबी सत्तार, राज्यमंत्री यांच्याकडील खाती (कंसात) प्राजक्त प्रसाद तनपुरे, राज्यमंत्री (महसूल), सतेज उर्फ बंटी डी. पाटील, राज्यमंत्री (ग्राम विकास), आदिती सुनिल तटकरे, राज्यमंत्री (बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य)
ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कडू, राज्यमंत्री यांच्याकडील खाती(कंसात) आदिती सुनिल तटकरे, राज्यमंत्री (शालेय शिक्षण), सतेज उर्फ बंटी डी. पाटील, राज्यमंत्री (जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, कामगार), संजय बाबुराव बनसोडे, राज्यमंत्री (महिला व बाल विकास), दत्तात्रय विठोबा भरणे, राज्यमंत्री (इतर मागास बहुजन कल्याण) सोपवण्यात आली आहेत.
COMMENTS