शाळा सुरू; पहिले १५ दिवस उजळणी

शाळा सुरू; पहिले १५ दिवस उजळणी

मुंबई: राज्यातील शाळा दरवर्षी सर्वसाधारणपणे १५ जूनला तर विदर्भात २६ जूनपासून  सुरू होतात. त्या प्रमाणे राज्यातील काही शाळांची ऑनलाईन सुरुवात झाली असून

‘देश आर्थिक मंदीत’
आपत्कालिन लस म्हणून कोवॅक्सिनला मंजुरी
अर्णव गोस्वामी : हायकोर्टाने जामीन फेटाळला

मुंबई: राज्यातील शाळा दरवर्षी सर्वसाधारणपणे १५ जूनला तर विदर्भात २६ जूनपासून  सुरू होतात. त्या प्रमाणे राज्यातील काही शाळांची ऑनलाईन सुरुवात झाली असून सर्व विद्यार्थ्यांचे नवीन शैक्षणिक वर्षात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्वागत केले आहे. विद्यार्थ्यांसाठी पहिले १५ दिवस आणि पुढील एक महिन्यात मागील वर्षीच्या अभ्यासक्रमाची उजळणी वर्ग घेण्यात येणार  असल्याची माहिती प्रा. गायकवाड यांनी दिली आहे.

प्रा.गायकवाड म्हणाल्या, कोरोनामुळे शाळा सुरू करतांना मागील वर्षी प्रमाणे या वर्षीही ऑनलाईन शिक्षण सुरू केले आहे. गेल्या वर्षी नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला गेला. व्हॉट्सअप, यूट्यूब या सोबतच दूरदर्शन आणि इतर माध्यमांचा वापर करून शिक्षण देण्यात आले. यासाठी शिक्षकांसह विद्यार्थी मित्र व इतर विविध उपक्रमांच्या माध्यमातून शिक्षण उपलब्ध करून दिले.

या वर्षी ब्रीज कोर्सची सोय उपलब्ध केली आहे. यात दहावीच्या विद्यार्थ्याला नववीचा अभ्यासक्रम शिकून सत्र दहावीसाठी लागणारा पाया मजबूत केला जाणार आहे. ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू करतांना विद्यार्थ्यांना अडचणी येऊ नयेत यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे कोरोना कालावधीत अनेक कारणांमुळे शाळा सुटलेल्या शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण सुरू असून त्यांना परत शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन कार्यरत असल्याचेही प्रा. गायकवाड यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि त्यांची सुरक्षितता यालाच प्राधान्य देऊन आरोग्य विभागाच्या समन्वयाने येणाऱ्या काळामध्ये परिस्थिती बघून शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असे सांगून प्रा. गायकवाड यांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0