कोविडची दुसरी लस न घेतलेले १० कोटी नागरिक

कोविडची दुसरी लस न घेतलेले १० कोटी नागरिक

नवी दिल्लीः देशभरातील १० कोटी ३० लाख नागरिकांनी कोविड-१९ प्रतिबंधित दुसरी लस घेतली नसल्याचे केंद्राने राज्यांना कळवले आहे. कोविशिल्ड या लसीच्या पहिल्य

ओमायक्रॉन : परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी नवे नियम
कोविड मृत्यूसंख्येबाबतचा डब्ल्यूएचओ अहवाल दडपण्याचा भारत सरकारचा प्रयत्न
विना मास्क दंडः गुजरातची २५२ कोटी रु.ची वसूली

नवी दिल्लीः देशभरातील १० कोटी ३० लाख नागरिकांनी कोविड-१९ प्रतिबंधित दुसरी लस घेतली नसल्याचे केंद्राने राज्यांना कळवले आहे. कोविशिल्ड या लसीच्या पहिल्या व दुसर्या खुराकामध्ये कमीत कमी १२ आठवड्यांचे तर कोवॅक्सिन लसीमध्ये ४ आठवड्याचे अंतर निर्धारित आहे. पण देशातील १० कोटी ३० लाख नागरिकांनी कोविड-१९ची दुसरी लस अद्याप घेतली नाही, असे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांना एका बैठकीत सांगितले. राज्यांनी अशा नागरिकांच्या दुसर्या लसीकरणाबाबत वेगवान पावले उचलावीत, आपले उद्दिष्ट्य नोव्हेंबर महिन्याअखेर पूर्ण करावे, असे मांडविया यांनी निर्देश केले.

कोविशील्डची दुसरी लस न घेणार्यांची टक्केवारी सुमारे ८५ टक्के आहे.

देशामध्ये लसीचे खुराक उपलब्ध आहेत. राज्यांकडे १२ कोटींपेक्षा अधिक खुराक आहेत, ज्यांचा अद्याप वापर केला गेलेला नाही. देशातील सर्व जिल्ह्यांचे लसीकरण करणे गरजेचे आहे, असे मांडविया यांनी म्हटले आहे.

देशात १०३ कोटी ९९ लाख नागरिकांना कोविड-१९ची पहिली लस देण्यात आली असून त्यातील ४४ लाख खुराक गेल्या बुधवारी देण्यात आले. आजपर्यंत देशातल्या ७७ टक्के वृद्धांना लसीचा पहिला खुराक देण्यात आला तर ३४ टक्के वृद्धांना लसीचे दोन्ही खुराक मिळालेले आहे.

देशातील राज्यांमध्ये लसीकरणाची टक्केवारी पुढील प्रमाणेः गुजरात (५३%), कर्नाटक (४६%), राजस्थान (३८%), मध्य प्रदेश (३५%), महाराष्ट्र (३३%), उत्तर प्रदेश (१८%), बिहार (२१%), पश्चिम बंगाल (२६%).

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0