गोग्रा भागात तैनात भारत-चीनच्या सैनिकांची माघार

गोग्रा भागात तैनात भारत-चीनच्या सैनिकांची माघार

नवी दिल्लीः भारत-चीनने गुरुवारी गोग्रा-हॉटस्प्रींग सीमा भागातल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगत तैनात असलेले आपले सैनिक मागे घेण्याचा निर्णय घेतला. तसे स

गूगलची ‘रिमूव्ह चायना अॅप’वर कारवाई
चीन ‘आरसेप’चा सदस्य
‘भारत-चीन तणावाबाबत १७ प्रश्नांना फेटाळले’

नवी दिल्लीः भारत-चीनने गुरुवारी गोग्रा-हॉटस्प्रींग सीमा भागातल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगत तैनात असलेले आपले सैनिक मागे घेण्याचा निर्णय घेतला. तसे संयुक्त परिपत्रक उभय देशांनी जारी केले असून दोन्ही देशांनी एकमेकांशी समन्वय साधत योजनाबद्धरित्या सैनिक माघारी बोलावले असे भारतातर्फे सांगण्यात आले. उभय देशांनी आपले सैनिक मागे घेतल्याने या परिसरात शांतता प्रस्थापित होईल असेही भारताचे म्हणणे आहे.

येत्या १७ सप्टेंबरला उझबेकीस्तान येथे शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनची परिषद होत असून या परिषदेच्या पार्श्वभूमीवर भारत-चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरचे आपापले सैन्य माघारी बोलावले आहेत. या परिषदेला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग उपस्थित राहणार आहेत. नोव्हेंबर २०१९ मध्ये ब्रिक्स परिषदेत मोदी-जिनपिंग यांच्यात प्रत्यक्ष चर्चा झाली होती. त्यानंतर ही पहिलीच भेट आहे.

आता भारत व चीनचे सैन्य लडाखमधील डेप्सांग येथील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनात असून तेथील सीमावादावार अद्याप तोडगा निघालेला नाही. २०२०मध्ये चीनच्या सैन्याने लडाखमध्ये घुसखोरी केली होती, त्यानंतर उभय देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर जून २०२०मध्ये दोन्ही देशांचे सैनिक एकमेकांना भिडले होते, यात भारताचे २० जवान ठार झाले होते व चीनचे तीन सैनिक ठार झाले होते. या घटनेनंतर मोठ्या प्रमाणावर सैन्य या भागात तैनात करण्यात आले होते. या भागात अद्यापही उभय देशांचे ५० ते ६० हजार सैन्य तैनात असून हे सैन्य पँगाँग सरोवर ते गोग्रा भाग एवढ्या प्रदेशात विभागलेले आहेत.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0