कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यातील मुरुग मठ संचालीत शाळेच्या वसतिगृहात राहणाऱ्या दोन अल्पवयीन विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी मुख्य पुजारी महंत शिवमूर्ती मुरुगा शरनारू यांना अटक करण्यात आली आहे. हा मठ लिंगायत समाजातील सर्वात प्रतिष्ठित आणि प्रभावशाली मठांपैकी एक आहे.
बेंगळुरू/चित्रदुर्ग: कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यातील लिंगायत समाजातील मुरुगा मठाचे मुख्य पुजारी महंत शिवमूर्ती यांना बाललैंगिक अपराधांचे संरक्षण (पॉक्सो) कायद्यांतर्गत माध्यमिक शाळेतील विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर अटक करण्यात आली. मुरुगा शरनारू याला ५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
राज्यात ही घटना उघडकीस आल्यानंतर, प्रख्यात पत्रकार आणि रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते पी. साईनाथ यांनी शुक्रवारी सांगितले की, ते २०१७ मध्ये मुरुग मठाने त्यांना प्रदान केलेला बसवश्री पुरस्कार परत करत आहेत.
शाळेतील मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी महंत यांना अटक करण्यात आल्यानंतर साईनाथ यांनी आपल्या ट्विटमध्ये पुरस्कार परत करण्याच्या निर्णयाची माहिती दिली.
साईनाथ यांनी लिहिले आहे, की ‘चित्रदुर्गातील श्री मुरुगा मठाचे पुजारी शिवमूर्ती मुरुगा शरनारू यांच्याशी संबंधित भयानक घडामोडींच्या मीडिया रिपोर्ट्समुळे मी सर्वात व्यथित झालो आहे. आता त्याच्यावर पोस्को आणि एससी/एसटी कायद्यांतर्गत केस दाखल करण्यात आली आहे.
ते पुढे म्हणाले, “शरनारूला लहान मुलांचे, विशेषत: शाळेतील मुलींच्या लैंगिक शोषणप्रकरणी अटक करण्यात आली आहे. मुलांवरील अशा कोणत्याही गुन्ह्याचा निषेध करण्यासाठी शब्द पुरेसे नाहीत.”
साईनाथ म्हणाले, “पीडितांच्या एकजुटीसाठी आणि या प्रकरणातील न्यायासाठी, मी २०१७ मध्ये मठाने मला दिलेला बसवश्री पुरस्कार (५ लाख रुपये बक्षीस रक्कम) परत करत आहे.”
ते पुढे म्हणाले, “मला म्हैसूर-मधील स्वयंसेवी संस्था ओडनाडी (OdaNadi) यांनी ही भीषण घटना उजेडात आणण्यासाठी आणि सामाजिक दुष्प्रवृत्तींविरुद्धचा त्यांचा दशकभर चाललेला लढा याचे कौतुक करायचे आहे. त्याच्या चिकाटीने तपास सुरू करणे भाग पडले आहे.
ते म्हणाले, “मी कर्नाटक सरकारला या घोटाळ्याच्या तपासाचा कठोरपणे पाठपुरावा करण्याचे आवाहन करतो आणि कोणत्याही कारणास्तव तडजोड होऊ देऊ नये,” असे ते म्हणाले.
दोन अल्पवयीन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी येथील न्यायालयाने शुक्रवारी ६४ वर्षीय महंत यांना ५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
मठ संचलित शाळेच्या वसतिगृहात राहणाऱ्या दोन अल्पवयीन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी महंत शिवमूर्ती मुरुगा शरनारू यांच्यावर लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायदा आणि एससी/एसटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरनारू हे राज्यातील लिंगायत समाजाच्या सर्वात प्रतिष्ठित आणि प्रभावशाली मठांपैकी एकाचे महंत आहेत.
२७ ऑगस्ट रोजी, जिल्हा बाल संरक्षण युनिटच्या अधिकाऱ्याने केलेल्या तक्रारीच्या आधारे महंत व्यतिरिक्त मठातील वसतिगृहाच्या वॉर्डनसह एकूण पाच जणांविरुद्ध हा एफआयआर नोंदवण्यात आला.
या मुलींनी २६ ऑगस्टच्या रात्री समुपदेशन सत्रादरम्यान ‘ ओडनाडी (OdaNadi) सेवा समस्थे’ या स्वयंसेवी सामाजिक संस्थेशी संपर्क साधला आणि त्यांना आपल्यावर हॉट असलेल्या अत्याचारांबद्दल सांगितले. त्यानंतर संघटनेने ही माहिती पोलिस प्रशासनाला सांगितली.
COMMENTS