शाह फैजल यांच्यावरील पीएसए मागे

शाह फैजल यांच्यावरील पीएसए मागे

श्रीनगर : जम्मू व काश्मीर पीपल्स मुव्हमेंटचे अध्यक्ष व माजी आयएएस अधिकारी शाह फैजल आणि पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीचे दोन नेते सरताज मदानी व पीर मन्सूर य

३७० कलम काश्मीरला जोडणारा धागा होता, भिंत नव्हती
काश्मीरातल्या ४५० जणांची परदेशवारी रोखली
लेखकावर कडक कारवाईची गृहमंत्रालयाची मागणी

श्रीनगर : जम्मू व काश्मीर पीपल्स मुव्हमेंटचे अध्यक्ष व माजी आयएएस अधिकारी शाह फैजल आणि पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीचे दोन नेते सरताज मदानी व पीर मन्सूर यांच्यावर सार्वजनिक सुरक्षा कायद्यांतर्गत (पीएसए) दाखल झालेले गुन्हे जम्मू व काश्मीर प्रशासनाने बुधवारी मागे घेतले. या तिघांची लवकरच सुटका होईल अशी शक्यता आहे.

भारतीय राज्यघटनेत जम्मू व काश्मीरला ३७० कलमांतर्गत दिलेला विशेष दर्जा संसदेने रद्द केल्यानंतर काश्मीर खोर्यातील अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांना स्थानबद्ध करण्यात आले होते आणि त्यानंतर काही नेत्यांवर पीएसए लावण्यात आला होता.

शाह फैजल यांना सहा महिने स्थानबद्ध केल्यानंतर फेब्रुवारी महिन्यात पीएसए लावण्यात आला होता. हा पीएसए १४ मे रोजी पुन्हा वाढवण्यात आला होता. पीएसए खाली अटक दोन वर्षांसाठी असते.

शाह फैजल हे काश्मीरमधील फुटीरतवादी चळवळीला मवाळवादी भूमिकेतून पाठिंबा देत असल्याचा आरोप त्यांच्यावर सरकारकडून ठेवण्यात आला होता.

पीएसए लावण्यात आलेले अन्य आरोपी सरताज मदानी हे जम्मू व काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांचे मामा असून त्यांच्यासोबत नॅशनल कॉन्फरन्सचे जनरल सेक्रेटरी अली मोहम्मद सगार यांना ताब्यात घेण्यात आले होते. या दोघांना सरकारी बंगल्यात ठेवण्यात आले होते. तर पीर मन्सूर यांच्यावर गेल्या ५ मे रोजी पीएसएचा कालावधी वाढवण्यात आला होता.

गेल्या मार्च महिन्यात नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख नेते ओमर अब्दुल्ला यांची सुटका करण्यात आली होती.

दरम्यान ओमर अब्दुल्ला यांनी फैजल, मन्सूर व मदानी यांच्यावरचा पीएसए मागे घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. पण मेहबुबा मुफ्ती, सागर एसबी, हिलाल लोन व नयीन अख्तर यांना अजून स्थानबद्ध केल्याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: